पंढरपूर लाईव्ह

 विशेष लेख:- बागवान एफ.आर.

 माहिती सहाय्यक,  उप माहिती कार्यालय,पंढरपूर

मुक्त अर्थ व्यवस्थेमुळे लोकांच्या हाती पैसा खेळतो आहे. वाढत्या अर्थकारणामुळे तो भौतिक सुविधाकडे वळतो आहे.बंगला, ऐशोआराम, गाडी, या सुविधांच्या अधिन होत आहे.विशेषत: युवा वर्गात अत्याधुनिक दुचाकी-चारचाकी वाहनांचे आकर्षण आहे. धूम सारखे चित्रपट या आकर्षणाला अधिक पाठबळ देतात. धूम चित्रपटातील दुचाकी बाईक आपणही त्याच जोशात चालवावी अशी तरुणाईची खुप इच्छा असते. चित्रपट केवळ तीनच तासांचा असतो.इथे संपूर्ण आयुष्य अपघाताविना घालावयाचे आहे हे बहुधा तो विसरतो.अन् त्यातुनच प्रारंभ होतो  दिनांक 1 ते 15 जानेवारी या कालावधी मध्ये रस्ता सुरक्षा पंधरवडा साजरा होत आहे. रस्ते अपघाताबाबत जागृती करण्याच्या उद्देशाने ठिकठिकाणी मोठ-मोठे पोस्टर्स, बॅनर्स लावण्यात येत आहेत.तसेच माहिती पत्रकाव्दारे जनतेला माहिती दिली जात आहे. मात्र हा यावरील उपाय होऊ शकत नाही.सेल्फ कंट्रोल (स्व नियंत्रण) हाच अपघात रोखण्यावरील सर्वोत्तम व खात्रीशीर उपाय होऊ शकतो.

 रस्ते सुरक्षा हे ध्येय समोर ठेवून सन 1939 मध्ये मोटार वाहन कायदा आपल्या देशात लागू झाला. हा कायदा लागू करताना रस्ते, दळणवळण यामध्ये होणारे स्थित्यंतर, प्रवाशी तसेच माल वाहतुक यांचे होणारे दळणवळण, रस्त्यांचे जाळे देशभर पसरवून त्यांचा विकास करणे, मोटार वाहनासंबंधी असलेल्या सुधारणा व्यवस्थित करणे. आदी बाबींचा या कायद्यामध्ये समावेश होता. महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल 1940 रोजी मोटार वाहन विभागाची निर्मिती झाली. त्यावेळी केवळ दीड हजार वाहनांची नोंद झाली होती.31 मार्च 2009 या वर्षा अखेर सुमारे 1 कोटी 45 लाख इतक्या वाहनांची नोंद प्रादेशिक परिवहन विभागाकडे झाली असून सुमारे 1 कोटी 76 लाख
55 हजार इतके पक्के लायसन्स धारक असल्याचे या विभागाच्या वतीने प्रसिध्द करण्यात आले. वाढत्या अपघाताला आळा घालण्यासाठी वाहनधारक, चालक यांनी संबंधीत वाहन सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वत:ला जाणीवपूर्वक चांगल्या सवयीही लावून घेणे आवश्यक आहे. अधिक वेगाने वाहन न चालविणे, वेग मर्यादेचे पालन करणे, प्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करणे. आवश्यक तेथे हॉर्न व डिप्परचा वापर करणे तसेच नो युटर्न, नो राइट टर्न, वन वे ट्रॉफिक, आदींच्या पालनाने आपण अपघाताला दूर ठेवू .

वाहन चालविताना सिग्नलकडे दुर्लक्ष करणे, एअर फोन लावून मोबाईलवरील गाणी ऐकणे, डाव्या बाजूने ओव्हरटेक करणे, मोबाईलवर बोलणे, वाहतुक पोलिसांना चकवा देणे या कृती म्हणजे शंभर टक्के अपघाताला निमंत्रण देणा-या कृती होय.रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी शक्यतो रात्रीचा प्रवास टाळणे, टायर्स मधील हवेचा दाब व ब्रेक तपासणे, ऑईल गळती पाहणे, वेग मर्यादा संभाळणे, दुचाकीवर स्वार असताना हेल्मेट वापरणे तर चार चाकी वाहनांमध्ये सिट बेल्टचा वापर करणे. या उपांयामुळे आपण अपघाताला दूर ठेवू शकतो.शॉर्ट कटच्या नादात आपले स्वत:चे नुकसान तर करुन घेतोच मात्र दुस-याचेही प्रचंड नुकसान करतो.याकडे लक्ष द्यायला
 केवळ रस्ता सुरक्षा पंधरवडयाने अथवा अभियानाने लगेचच अपघात थांबतील असे नाही. मात्र ही आश्वासक सुरुवात होती आहे ही बाब दुर्लक्षीत करुन चालणार नाही.   प्रगतीसाठी गती आवश्यक आहे.परंतू इतकीही  गती नको की, ज्यामुळे जीवन अधोगतीकडे जाईल.प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ) अथवा पोलिस प्रशासन (वाहतुक शाखा) हे अपघात टाळण्यासाठी किंबहुना ते होवूच नये यासाठी सतत प्रयत्नशिल असतात.त्यांच्या या प्रयत्नाला सर्व वाहनधारक, चालकांनी थोडेसे काळजी व गांभीर्यपूर्वक वाहन चालवून हातभार शेवटी इतकंच सांगणे आहे की, वेगाच्या प्रेमात न पडता वाहनांच्या प्रेमात पडा. लवकर निघा...सावकाश जा... सुरक्षित पोहचा... हे सांगण्याठी कशाला? कोणाची आवश्यकता हवी? ऐकतांना! गाडी हळू चालवा, घरी कोणीतरी तुमची वाट पहात आहे.....
..

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 14 जानेवारी 2015 रोजी  42,745 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   14 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2581 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................

Poste