प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाची विक्री करणार्‍यावर त्वरीत कारवाई केली जाईल - उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव

राष्ट्रध्वजाचा मान राखण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे निवेदन

पंढरपूर लाईव्ह

 पंढरपूर (जि. सोलापूर) 9 जानेवारी 2015 

 राष्ट्रीय सणांच्या दिवशी प्लॉस्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजाच्या माध्यमातून होणारी विटंबना रोखण्यासाठी पंढरपूर येथे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने उपविभागीय पोलीस अधिकारी आणि प्रांताधिकारी यांच्यासाठी कारकून शुभांगी अधटराव यांना निवेदन देण्यात आले.

        
 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट यावेळी मोठ्या अभिमानाने मिरवले जाणारे हे प्लॅस्टिक किंवा कागदी राष्ट्रध्वज अगदी त्या दिवसापासून रस्त्यावर, गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. याशिवाय प्लॉस्टिक वापरामुळे ते
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव म्हणाले की, आमच्याकडून फेरीवाले अगर दुकानदार प्लॅस्टिक राष्ट्रध्वजाची विक्री करत असतील तर त्याच्यावर त्वरीत कारवाई करू. त्याचवेळी त्यांनी तत्परतेने शहर पोलीस निरीक्षकांना आदेश पाठविण्याचे नियोजन केले. तसेच प्रांताधिकारी यांच्या वतीने अव्वल कारकून शुभांगी अधटराव म्हणाल्या की, पंढरपूर तहसिलदारांना तत्परतेने कळविले जाईल आणि जे कोणी प्लॉस्टिकचे राष्ट्रध्वज विक्री करताना आढळतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी असे आदेश आमच्याकडून देण्यात येईल.
        
यावेळी सामाजिक कार्यकर्ते ( वाचक, पत्रव्यवहार पुरस्कारकर्ते)  शेखर नागटिळक, पेशवा युवामंचचे  सौरभ थिटे(पाटील), गणेश लंके, सौदागर जगदाळे, ज्ञानेश्वरी कळकुंबे, सनातन संस्थेच्या सौ. सुरेखा भोसले, रणरागिणी शाखेच्या सौ. सरस्वती निकम, शकुंतला खरात, सारीका भोसले, हिंदू जनजागृती समितीचे शशीशेखर पाटील, मोहन लोखंडे, सिध्दिविनायक खरात, बाल कार्यकर्ते श्लोक पाटील, ओंकार भोसले आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
छायाचित्र
लगेच नष्ट ही होत नाहीत. त्यामुळे होणारी विटंबना थांबवण्यासाठी प्लॉस्टिकच्या राष्ट्रध्वजाची होणारी विक्री रोखून संबंधितावर कठोर कार्यवाही करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
 1) उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश जाधव निवेदन देताना कार्यकर्ते. 
2) प्रांताधिकारी यांच्या वतीने अव्वल कारकून शुभांगी अधटराव यांना निवेदन देताना. कार्यकर्ते.
............................

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 12 जानेवारी 2015 रोजी  41,598  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   12 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2438 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................

Post a Comment

0 Comments