पंढरपूर माळी युवक संघनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी
पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर माळी युवक संघनेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांची जयंती साजरी
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर माळी युवक संघटना यांच्या वतीने विविध उपक्रम राबवत क्रांतीज्योतीस दि. 4 जानेवारी 2015 रोजी अभिवादन केले.
यावेळी सौ. साधनाताई नागेश भोसले (नगराध्यक्षा) यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. नगराध्यक्ष वामनतात्या बंदपट्टे हे होते.
यावेळी बालकल्याण समिती सभापती सौ. रतनताई मस्के, मा. नगरसेविका शोभाताई देवमारे, माजी नगराध्यक्ष संजय घोडके, नगरसेवक राजेंद्र सर्वगोड, भारत माळी सर, संचालक रामचंद्र माळी, सौ. प्रियांका गणेश सिंघण (शिक्षीका), खादी ग्रामोद्योग सदस्य गणेश नागेश सिंघण, माळी युवक संघटनेचे अध्यक्ष वैभव गाडेकर, अमोल डोके, सचिन गोडसे, सागर नवले, शरद गाडेकर, संतोष देवमारे, मंगेश क्षिरसागर, आदी उपसिथत होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिवाजी मेडसिंगकर सर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आतिष देवमारे, अक्षय देवमारे. रवि देवमारे, मसु राऊत यांनी परिश्रम घेतले.
________________________________________________
-
___________________________________
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 3 जानेवारी 2015 रोजी 37, 651 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
3 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1915 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com




0 Comments