पंढरपूर लाईव्ह:-
बिटरगाव (ता.पंढरपूर) येथील धरणग्रस्तास अजनसोंड (ता.पंढरपूर) मधील चौघा खाजगी सावकारांनी पैसे देवाण-घेवाणीच्या कारणांवरुन बेदम मारहाण करत दमदाटी केल्याचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार आज दि. 4 जानेवारी 2014 रोजी घडला असून याबाबत पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात अजनसोंडमधील चौघा आरोपींविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड व बिडरगांव ही दोन्ही गावे जवळ-जवळ आहेत. बिटरगांवमध्ये समाधान रामदेव महानवर हे धरणग्रस्त रहातात. त्यांनी अजनसोंडमधील खाजगी सावकारांकडून कांही रक्कम घेतलेली होती. ती परत केलेली असतानाही अजून पैशाची मागणी करत आरोपींनी श्री.महानवर यांना दमदाटी करत बेदम मारहाण केली. याबाबत अजनसोंडमधील प्रकाश कुबेर दुबल, किसन हरी दुबल, ज्ञानेश्वर दुबल व गणेश अरुण दांडगे या चौघांविरुध्द भा.द.वि. 323, 504, 506 या कलमान्वये पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात आज गुन्हा दाखल झाला आहे. यातील फिर्यादी समाधान रामदेव महानवर यांना मारहाण झाल्यामुळे ते जखमी झाले असून त्यांच्यावर पंढरपूरमधील कॉटेज हॉस्पिटल मध्ये उपचार चालु आहेत. याबाबतचा पुढील तपास हे.कॉन्स्टेबल चव्हाण हे करीत असल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याकडून मिळाली.
सरकारने खाजगी सावकारकी विरुध्द कडक कायदे केले असले तरी कायद्याची अंमलबजावणी योग्य पध्दतीने तरी होत नाही किंवा सावकारांच्या दडपणाखाली असणारे खाजगी सावकारीने पीडीत लोक आपल्यावर झालेल्या अन्यायाविरुध्द गुन्हे दाखल करण्यास पुढे येत नाहीत....
यामुळेच अवैधरित्या आपली खाजगी सावकारकी चालविणारांची दुकाने बिनदिक्कतपणे जोरात चाललेली पहावयास मिळतात...सध्या राज्यावर दुष्कालाचे सावट पसरलेले असताना... गोर-गरीव हवालदिल झालेले आहेत. यातच सावकारांचा तगादा जीवघेणा असतो... प्रसंगी मारहाणीचे असे प्रकार घडतात...दुष्काळी परिस्थितीतच खाजगी सावकारांचा हा गोरख धंदा मात्र तेजीत चाललेला असतो... ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांनी पुढे येवून अशा खाजगी सावकारांवर गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे... तरच यांना जरब बसून गोर-गरीबांची जीवघेण्या छळातून मुक्ती होईल.... तरच खाजगी सावकारीच्या दुष्ट पाशात अडकलेला सामान्य माणुस मोकळा श्वास घेईल....
________________________________________________
-
____________________
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 4 जानेवारी 2015 रोजी 38, 176 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
4 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1985 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com



0 Comments