पंढरपूर लाईव्ह
दिनांक : 17 जानेवारी, 2015
आता आठवड्यापूर्वीही नोंदणी शक्य मुंबई, दि. 17 : मंत्रालयातील प्रवेशासाठी कालपासून ऑनलाईन पासेस मिळण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून या पासेसमुळे आता मंत्रालयात येणार्या प्रत्येक व्यक्तीला प्रवेश करणे सोपे झाले आहे. या सुविधेनुसार एक आठवड्यापूर्वी देखिल मंत्रालयात प्रवेश निश्चित करता येणार आहे.
सामान्य प्रशासन आणि गृहविभागाने www.maharashtra.gov.in या संकेत स्थळाच्या होमपेजवर नोंदणीची सोय उपलब्ध करुन दिली आहे. या ठिकाणी दिलेल्या नमुन्यात आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केल्यानंतर संबंधितांच्या मोबाईलवर कोड पाठविण्यात येईल. मोबाईलवरील हा कोड प्रवेशाच्यावेळी दाखविल्यानंतर मंत्रालयात जाता येईल. या सुविधेमुळे मंत्रालयात प्रवेशासाठी होणारा त्रास कमी होऊन लोकांना आपली कामे तसेच एकदा नोंदणी झाल्यानंतर दुसर्यावेळी संबंधित व्यक्तीस प्रवेश करण्यासाठी पुन्हा रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नसून जुना नोंदणी क्रमांक दिल्यास मंत्रालयात प्रवेश करता
0 0 0 0
..........

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 17 जानेवारी 2015 रोजी 44,012 एवढी आहे...
"पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना
झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत 17 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2743 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या
मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
0 Comments