पंढरपूर-दि.05- पंढरपूर रेल्वे स्टेशनच्या फलाट क्रं. 1 वरती एक अनोळखी व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली असता त्यास पूढील उपचारासाठी उप-जिल्हा ग्रामिण रुग्णालय, पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल केले असतांना दि. 5 जानेवारी 2015 रोजी उपचारादरम्यान ती व्यक्ती रुग्णालयात मयत झाली असत्याची माहिती पंढरपूर रेल्वे पोलिसांनी एका पत्रकान्वये कळविली आहे.
या अनोळखी मयत व्यक्तीचे वय अंदाजे 25 ते 30 वर्षे, शरीर बांधा मध्यम, उंची 5 फुट 4 इंच, वर्ण सावळा, नाक बसके, डोकीचे केस काळे वाढलेले, मिशी बारिक, चेहरा उभट, अंगामध्ये पांढरा बटनाचा नक्षीचा शर्ट, पांढरे बनियान, निळ्या रंगाची जिन्स पॅंट, निळ्या रंगाची अंडर पँट तसेच उजव्या हातावरती LUXEMN गोंदलेले असे मयत व्यक्तीचे वर्णन असून, संबधीत नातेवाईकाने तसेच ओळखीच्या व्यक्तींनी पंढरपूर लोहमार्ग पोलिस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0 Comments