विवेकानंदाच्या विचारांची देशास खरी गरज- प्रमोद शहा

पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर (प्रतिनिधी) दि. 12 - स्वामी विवेकानंद यांनी दिलेली शिकवण ही संपूर्ण जगाला प्रेरणा देणारी असून त्याप्रमाणे सर्वांनी आचरण केले, त्यांनी दिलेल्या संदेशाचे प्रत्येकाने आचरणात आणून आत्मनिर्भर झाले तर आपला देश समृद्ध होण्यास वेळ लागणार नाही. स्वामी विवेकानंद हे खरे तर आपल्या देशाची एक विचारधारा असल्याने त्यांच्या विचारांची देशास खरी गरज असल्याचे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा पंढरपूरचे उपाध्यक्ष प्रमोद शहा यांनी केले.

स्वामी विवेकानंदांची 152 वी जयंती आज ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा पंढरपूर यांच्या वतीने आज साजरी करण्यात आली. प्रारंभी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन प्रमोद शहा यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हा संघटक प्र. वि. कुलकर्णी (सर) जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश फडे होते.
 
पुढे बोलताना प्रमोद शहा यांनी सांगितले की, सर्वांनी आत्मनिर्भर बनल्यास प्रत्येकाचा आत्मविश्वास वाढणार असून प्रत्येकाने आत्मनिर्भर बनून कार्य केल्यास स्वामी विवेकानंदाना खर्‍या अर्थाने अभिवादन ठरेल. यावेळी प्रमुख पाहुणे प्र. वि. कुलकर्णी (सर) , डॉ. राजेश फडे यांनी विवेकानंदांचे कार्य व त्यांची प्रेरणा घेऊन ग्राहक पंचायत कार्य करीत असल्याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमास शहर अध्यक्ष दिनेश खंडेलवाल, जिल्हा सचिव गुरुनाथ बहिरट, जिल्हा कोषाध्यक्ष सचिन कदम, शहर सचिव चिंतामणी दामोदरे, माजी शहर अध्यक्ष नंदकुमार देशपांडे, जयंत सोमण, प्रा. तानाजी घाडगे, महादेव खंडागळे, विशाल खंडागळे, संजय कोकरे, विधी सल्लागार अ‍ॅड. सौ. श्रद्धा बहिरट, डॉ. सौ. सपना फडे, सौ. सविता देशपांडे, सौ. ज्योती खंडेलवाल यांच्यासह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
.................

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 12 जानेवारी 2015 रोजी  42,040  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   12 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2490 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................

Post a Comment

0 Comments