प्रेमी युगुलास मारहाण करुन दहशत पसविण्याचा प्रयत्न करणार्‍या ‘गनिमी कावा’ च्या तिघांना अटक

पंढरपूर लाईव्ह

17 जानेवारी 2015

लातुर (प्रतिनिधी):- प्रेमी युगुलास मारहाण करुन त्यांचे  व्हिडीओ चित्रीकरण  व्हॉटस्अपवर प्रसिध्द  करुन प्रेमी युगुलांवर दहशत पसविण्याचा प्रयत्न करणार्‍या ‘गनिमी कावा’ या  संघटनेच्या सहा जणांवर गुब्हा दाखल झालेला असून या पैकी तिघांना अटक करण्यात आलेली आहे.

महाविद्यालयीन तरुण-तरुणी एकत्र येणे काही जणांना आवडत नाही. हा प्रकार संस्कृतीच्या विरोधात असल्याचे सांगत कायदा आपल्या ताब्यात घेत जरब बसवण्याचा या मंडळींचा खाक्या असतो. लातूरमध्ये दोन महिन्यांपूर्वी एका प्रेमी युगुलास लाथा-बुक्क्याने मारहाण करून त्याचे चित्रण व्हॉट्सअपवर टाकले गेले. गुरुवारी सायंकाळी ते एका दूरचित्रवाहिनीने ते प्रकाशित केले. प्रेमी युगुलास मारहाण करणारी ही चित्रफीत नेमकी कुठली? याचा तपास पोलिसांनी सुरू केला व अवघ्या दोन तासांत चक्र फिरले. लातूर जिल्हय़ातील हा प्रकार असल्याचे पोलिसांना लक्षात आले व रात्रीतून सहापकी तीन आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणी मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
गनिमी कावा संघटनेचा जिल्हाध्यक्ष बालाजी गोडसे, अमोल खंदारे, राकेश गोडसे, नितीन गोडसे, संदीप गोडसे, अक्षय बनसोडे (सर्व साखरा, तालुका लातूर) यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. संदीप गोडसे, अमोल खंदारे व नितीन गोडसे यांना पोलिसांनी अटक केली. बालाजी गोडसे, अक्षय बनसोडे व राकेश गोडसे हे तिघे फरारी आहेत. दरम्यान, या सहा जणांना गनिमी कावा संघटनेतून बडतर्फ केल्याचे प्रदेशाध्यक्ष प्रा. राजकुमार सूर्यवंशी यांनी कळवले आहे.

दहशत पसरवण्याचा प्रताप अंगलट!

गेल्या ३० नोव्हेंबरला लातूर-मुरूड रस्त्यावर साखरा पाटी ते अंकोली दरम्यान प्रेमी युगुलास सायंकाळच्या सुमारास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. यातील मुलीला तिच्या पालकाच्या स्वाधीन करून संघटनेचे कार्यकर्ते निघून गेले. मात्र, व्हॉट्सअपमुळे या प्रकाराची चर्चा पसरली. आणखी किती युगुलांबाबत असे प्रकार घडले असावेत? याचा तपास पोलीस करीत आहेत.

.....

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 17 जानेवारी 2015 रोजी  44,049 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   17 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2747 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा

                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................

 




Post a Comment

0 Comments