खेळाडूंनी खिलाडीवृत्ती जोपासल्यास पुन्हा क्रिडा क्षेत्राला अछ्ये दिन! -खो खो असोशियनचे उपाध्यक्ष रामचंद्र दत्तू

पंढरपूर लाईव्ह

श्री विठ्ठल डिप्लोमा पोलिटेक्निक इंजिनिअरिंग मध्ये एम.एस.बी.टी.ई.अंतर्गत स्पर्धेचे उदघाटन

पंढरपूर;- प्रत्त्येक खेळांमध्ये प्रतिस्पर्धी कसाही असो अशा वेळी अम्पायरने दिलेल्या निर्णयावर खेळाडूने खिलाडीवृत्ती जोपासल्यास क्रीडा प्रकाराला पुन्हा अच्ये दिन येतील. असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा खो खो असोसियशनचे उपाध्यक्ष रामचंद्र दत्तू यांनी केले.  येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित डिप्लोमा पोलिटेक्निक इंजिनिअरिंग कॉलेजच्या भव्य मैदानावर एम.एस.बी.टी.ई.अंतर्गत खो खो व कब्बडी सामन्याचे आयोजन केले आहे. यास्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष दत्तू उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना बोलत होते.


 स्पर्धेचे, मैदानाचे व खेळ स्पर्धा पताक्याचे उदघाटन राष्ट्रीय खेळाडू व महाराष्ट्र खो खो संघाचा कर्णधार सागर लेंगरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी पुणे विभाग एम.एस.बी.टी.ई. सी झोन अंतर्गत सोलापूर व सातारा जिल्ह्यातील डिप्लोमा पोलिटेक्निक महाविध्यालयातील संघ व्यवस्थापकांच्या साक्षीनेच खेळाचे लाँटस पाडण्यात आले. राष्ट्रीय खेळाडू लेंगरे यांनी आपल्या ग्रामीण भागातील खेळापासून ते थेट महाराष्ट्र संघात कर्णधार होण्यापर्यंतची खडतर वाटचाल सांगितली.पुढे बोलताना उपाध्यक्ष दत्तू म्हणाले क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविल्यास त्याचा फायदा पुढे स्पर्धा परीक्षा,पोलीस विभाग,मिलिटरी, अशा प्रशासकीय सेवेत होतो. अश्या राष्ट्रीय खेळाडूंसाठी राखीव जागा ठेवण्यात येते. तसेच प्रत्येक खेळाडूंनी आपल्या अंगी खिलाडूवृत्ती जोपासावी. कारण खेळात प्रामाणिक राहिल्यास आपले यश कोणीच हिरावून घेवू शकत नाही. तसेच या ठिकाणी राष्ट्रीय पंच असल्यामुळे कोणत्याही खेळाडूंवर अन्याय होणार नाही. याची खात्री आहे. संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी(पदवी)चे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात खेळाडूंनी विजयी झाल्यानतर त्याचा जास्त अतिरेकी विजय साजरा न करता पराभूत संघालाही तेवढ्याच आत्मीयतेने धीर दिला पाहिजे.तसेच पराभूत संघाने देखील आपले मनोध्येर्य मनोध्येर्य  खचू न देता खिलाडीवृत्ती जोपासून पुढच्या वेळी याची भरपाई खेळामधूनच करण्याची तयारी केली पाहिजे. पराभूत होवून देखील आपल्या खिलाडीवृत्तीमुळे तो खेळ दिर्घकाळ स्मरणात रहातो.’ सर्व स्पर्धकांना अक्षय नागणे यांनी खेळातील आचारसंहिते विषयी यांनी शपथ दिली.
        यावेळी संस्थेचे विश्वस्त बी.डी.रोंगे,खो खोचे मार्गदर्शक शेखर जोड्मोटे, कबड्डीचे पंच नागनाथ क्षीरसागर,संघव्यवस्थापक  विजय फटे, सोमनाथ गायकवाड,प्रवीण गोमे, अविनाश नागणे, विजय मोरे, जावेद मुलांनी या पंचांसह कब्बडीचे 12 संघ व खो खो चे 10 संघ पहिल्या दिवशी उपस्थित होते. या स्पर्धा सचिव डॉ. रोंगे व प्राचार्य एन.डी.मिसाळ यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख प्रा.पी.पी.भोसले, प्रा.एस.डी.भिंगारे व प्रा पी.एम.पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत असून यासाठी इतर प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.प्रा सचिन जगदाळे हे सूत्रसंचालन करीत असून उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे.
छायाचित्र- 1.श्री विठ्ठल डिप्लोमा पोलिटेक्निक इंजिनिअरिंग मध्ये एम.एस.बी.टी.ई.अंतर्गत खो खो व कब्बडी स्पर्धेचे उदघाटन करताना राष्ट्रीय खेळाडू व महाराष्ट्र खो खो संघाचा कर्णधार सागर लेंगरे सोबत डॉ. रोंगे, प्राचार्य मिसाळ, सोलापूर जिल्हा खो खो असोशियशनचे उपाध्यक्ष रामचंद्र दत्तू, मार्गदर्शक जोड्मोटे, कबड्डीचे पंच क्षीरसागर आदी 2. खो खो मध्ये एका खेळाडूला बाद करतानाचे चुरसीचा क्षण.










..

"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 19 जानेवारी 2015 रोजी  45,141 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत   19 जानेवारी 2015 रोजी तब्बल 2916 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा

                    ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती.

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

  आपला :-- भगवान गणपतराव वानखेडे (संपादक) 

   आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

..........................

 



Post a Comment

0 Comments