पंढरपूर लाईव्ह
एका
महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार आज दि. 5 जानेवारी 2015 रोजी पंढरपूर
तालुका पोलिस ठाण्यातील एका खोलीत सापळा रचून अॅन्टी करप्शन ब्युरो,
सोलापूर च्या पथकाने पंढरपूर तालुक्यातील पुळूजचा बीट हवालदार मल्लीनाथ
बंदीछोडे सह सुस्ते येथील रमेश रोकडे यांना 2000/- रु. ची लाच घेताना
रंगेहाथ पकडले आहे.
संगीता हत्ती (पोलिस निरीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो, सोलापूर) यांच्याकडून एका प्रसिध्दी पत्रकान्वये मिळालेल्या माहितीनुसार या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, मल्लीनाथ सिध्दप्पा बंदीछोडे पोलिस नाईक बक्कल नं. 87, नेमणूक पुळूज बीट, अंकीत पंढरपूर तालुका पोलिस ठाणे, सोलापूर ग्रामीण वर्ग 3 व खाजगी इसम नामे रमेश शंकर रोकडे वय 47 वर्षे (रा. सुस्ते, ता.पंढरपूर, जि.सोलापूर) यांना 2000/-रु. लाच स्वीकारली असता रंगेहाथ पकडले. महिला तक्रारदार यांच्या भावास पंढरपूर तालुका पोलिस ठाणे येथे बोलावून त्याच्या विरुध्द एका महिलेने दिलेल्या तक्रारीप्रमाणे तक्रारदार यांच्या भावावर कायदेशीर कारवाई न करणेसाठी पुळूज बीट चे पोलिस नाईक मल्लीनाथ सिध्दप्पा बंदीछोडे, पोलिस नाईक बक्कल नं. 87 यांनी 5000/- रु. ची मागणी केली. वगैरे मजकुराची तक्रार दि. 5 जानेवारी 2015 रोजी नोंदविली.
सदर तक्रारीनुसार दि. 8 जानेवारी 2015 रोजी पंढरपूर शहरातील पंढरपूर तालुका पोलिस ठाणे येथे बंदीछोडे पोलिस नाईक यांचेविरुध्द लाचेचा सापळा लावण्यात आला होता. सदर लावण्यात आलेल्या सापळ्यादरम्यान मल्लीनाथ सिध्दप्पा बंदीछोडे, पोलिस नाईक बक्कल नं. 87 याने महिला तक्रारदार यांच्या भावावर कारवाई न करणेकरीता बक्षिस म्हणून तडजोडीने 2000/- रु. लाचेची मागणी करुन खाजगी इसम नामे रमेश शंकर रोकडे (वय 47) रा. सुस्ते, ता. पंढरपूर, जि.सोलापूर यांचेमार्फत 2000/- रु. लाच तालुका पोलिस ठाण्यातील खोलीत स्वीकारली असता पो.ना./87 बंदीछोडे व खाजगी इसम रमेश शंकर रोकडे यांना अॅन्टीकरप्शन ब्यूरो सोलापूर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी रंगेहाथ पकडले.
मल्लीनाथ सिध्दप्पा बंदीछोडे या पोलिसाच्या विरुध्द पंढरपूर तालुका पोलिस स्टेशन, सोलापूर ग्रामीण येथे ला.प्र.का.कलम 7, 12, 13 (1) (ड), सह 13 (2) प्रमाणे गुन्हा नोंदविण्याचे काम चालु आहे.
सदरची सापळा कारवाई पोलिस अधिक्षक, अतिरिक्त पोलिस अधिक्षक, अॅन्टीकरप्शन ब्यूरो पुणे यांचे मार्गदर्शनाखाली अॅन्टी करप्शन ब्यूरो सोलापूर युनिटने केली आहे.
याद्वारे जनतेस आवाहन करण्यात येते की, जर कोणी शासकीय/निमशासकीय लोकसेवक त्यांचे पदीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर कार्यालयाशी प्रत्यक्ष अगर टोल फ्री क्रमांक 1064, फोन नं. (0217) 2312668, मोबाईल क्रमांक- 9404662498, 9404663697 वर संपर्क साधावा.
---------------------------------------------------
-++++++++++++++++++++++++++++++++++++
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
http://market.android.com/

____________________
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 4 जानेवारी 2015 रोजी 38, 176 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
4 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1985 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com



0 Comments