पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर दि. 06 : येत्या 24 जानेवारी ते 3 फेब्रुवारी 2015 या कालावधीत माघी यात्रा संपन्न होणार आहे. या यात्रेच्या यशस्वीतेसाठी संबधित विभागाने सज्ज रहावे व यात्रा निर्विघ्नरित्या पार पडावी यासाठी आत्तापासूनच नियोजन करावे असे निर्देश प्रांतधिकारी संजय तेली यांनी दिले. माघी यात्रेचा आढावा घेण्यासाठी प्रांतधिकारी
यांच्या दालनात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाने वाळवंटाच्या ठिकाणी बॅरेगेटींग करावे, यात्रा कालावधी होणारे अतिक्रमण काढावे. मंदीर समितीने 20अतिरिक्त सी.सी.टी.व्ही. कॅमेरे लावावेत. त्याचबरोबर भाविकांना देण्यात येणा-या प्रसादासाठी अतिरिक्त स्टॉल लावावा. तहसिलदारांच्या मार्गदर्शनाखाली संबधितांनी
नियत्रंण कक्ष अद्यावत ठेवावा, नगरपालिकेने भाविकांच्या सुविधांसाठी शौचालयबाबतचे नियोजन करावे, तसेच सबंधित विभागाने पाणीपुरवठ्याचे दुषीत पाण्याचे स्त्रोत तपासूण घेवून ते बंद करावेत असे आदेश प्रांतधिका-यांनी यावेळी दिले.न.पा.चे मुख्यधिकारी शंकर गोरे म्हणाले की, नगरपालिकेच्या वतीने माघी
यात्रेसाठी सुमारे 1 हजार 325 टॉयलेटचे नियोजन करण्यात आले आहे.तर सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.पंकज गायकवाड यांनी यात्रा कालावधीत आरोग्य विभागाकडून 4 व्हेंटीलेटर मिळावेत अशी मागणी केली.
यावेळी पोलिस, बी.एस.एन.एल, अन्न व औषध प्रशासन, उत्पादन शुल्क, भिमा पाटबंधारे, एस.टी.महामंडळ, महावितरण, सा.बां. विभाग यांच्यासह इतर संबधित विभागाचा आढावा या बैठकीत प्रांतधिका-यांनी या आढावा बैठकीसाठी मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश जाधव, तहसिलदार गजानन गुरव, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे, कार्य. अभियंता (भीमा पाटबंधारे) एस.पी. शिंदे, महावितरणचे नरसिंह बिट्रा, यांच्यासह संबधीत विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
-------------------------------------------------
-++++++++++++++++++++++++++++++++++++
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
http://market.android.com/

----------------------
बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"
"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 4 जानेवारी 2015 रोजी 38, 176 एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत
4 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1985 अँन्ड्राँईड मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ... या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....
पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा
ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती
http://market.android.com/ search?q=pname%3Acom.wPandh arpurLive
आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com





0 Comments