मुलींनी स्वसंरक्षण करताना वेळप्रसंगी पोलिसांची मदत घ्यावी- पोलिस अधिक्षक दत्तात्रय मंडलिक

पंढरपूर लाईव्ह 

मुलींनी स्वरक्षण करताना वेळप्रसंगी पोलिसांची मदत घ्या

  - पोलिस अधिक्षक दत्तात्रक मंडलिक

 श्री. विठ्ठल अभियांत्रिकीत ‘क्रांतीज्योती सावित्रीबार्इ फुले जयंती’ व ‘महाराष्ट्र पोलिस रेझींग डे’ संपन्न

पंढरपूर-  ‘आज विशेषता ग्रामिण भागातील मुलींनी जास्त सतर्क राहून रोडरोमियो, छळ करणारा इसम यांच्या विरोधात ठोस पावले उचलून त्यांना योग्य धडा शिकविला पाहीजे. वेळ प्रसंगी अशा रोडरोमियोंचे,त्यंाच्या वाहनांचे वर्णन पोलिसांना कळविल्यास त्यांचा बंदोबस्त करणे सोपे जार्इल. तसेच महाविद्यालय, एस.टी. स्टॅड, रिक्षा स्टॉप, आदी सार्वजनिक ठिकाणी आता पोेलिस विशेष लक्ष देत आहेत. त्यांना सहकार्य करुन अशा त्रास देणार्‍या इसमांचे नाव पोलिसांकडे द्या. मगच अशा प्रवृत्तींना आळा बसेल.’असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा पोलिस प्रमुख (ग्रामीण) दत्तात्रय मंडलिक यांनी केले.

       श्री. विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इंन्स्टिट्युट पंढरपूर व सोलापूर जिल्हा ग्रामिण पोलिस दल यांच्या सयुक्त विद्यमाने ‘क्रांतीज्योती सावित्रीबार्इ फुले यांची 184 वी जयंती व महाराष्ट्र पोलिस रेझींग डे’ निमित्ताने युवतींच्या सुरक्षा प्रश्‍नांबाबत एस. पी. मंडलीक मार्गदर्शन करत होते. स्वेरीच्या मध्यवर्ती अ‍ॅम्पी थिएटर मध्ये आयोजिलेल्या कार्यक्रमात के.बी.पी. महाविद्यालय, विवेकवर्धिनी, औंदुबर पाटील महाविद्यालय, शासकीय वसतिगृह,बी.सी.ए,आय.सी.एम.सी, कर्मयोगी पॉलिटेक्नीक आदी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनींना स्वेरीमध्ये आमंत्रित केले होते.क्रांतीज्योती सावित्रीबार्इ फुले यांच्या प्रतिमेच्या पुजनानंतर एस.पी.मंडलीक यांनी ‘टेक ऑल प्रिकॉशन्स् ऑल टार्इम’असा संदेश देवून ‘मुलींनी घ्यावयाची काळजी’ व ‘पोलीस प्रशासनाने गुन्ह्यांच्या विरोधात उचलेली कठोर पावले’ या बाबत मार्गदर्शन केले.पोलीस उपविभागीय अधिकारी मनिषा दुबुले यांनी महिलांवरील अत्याचार, यावर उपाय व पोलिसांचे कार्य याबाबत बहुमोल मार्गदर्शन करताना ‘पोलिसांना मित्र मानून त्यांना सहकार्य करा. पोलिस हे जनतेच्या रक्षणासाठी आहेत या करता कोणत्याही संकटाची कल्पना पोलिसांना दया.’असे सांगून 354,376 या कायदा कलमांचे स्वरुप त्यावरील शिक्षा व तरत्ाूद यासाठी घ्यावयाची खबरदारी सांगितली.लैगिंग छळ प्रतिबंधकच्या अध्यक्षा सुजाता यादगिरी यांनी महिला सुरक्षेसाठी असणार्‍या कमिटीचे कार्य यावर प्रकाश टाकला स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आत्तापर्यंतची वाटचाल या बाबत सविस्तर माहिती देवून अन्याय करणार्‍यांपेक्षा अन्याय सहनकरणारे जास्त गुन्हेगार असतात.’ असे सांगून स्वाती चाफळे या विद्यार्थीनीची धाडसी कहाणी सांगितली. यावर उपस्थित विद्यार्थींनींचा आत्मविश्‍वास आणखीनच वाढला.
       प्ाुढे बोलताना एस.पी मंडलीक म्हणाले,‘ कोणत्याही मुलींनी अनोळखी व्यक्तीशी संभाषण करु नये तसेच पालक वर्गाने देखील जागृत राहून पाल्यांच्या सुरक्षेबाबत योग्य नियोजन करावे. छेडछाडीच्या व 354 या भा.द.वि. कायदा कलम प्रकारात आता अनेक प्रकाराचे समावेश केले आहेत. रागाने पाहणे, शेरेबाजी करणे, पाठलाग करणे, शिवीगाळ करणे अशा स्वरुपांच्या  रोडरोमियोच्या कारवाया त्वरीत जवळच्या पोलिस स्टेशनला कळवा.आता जर तो त्रास सहन केला तर त्या अपरिचित रोडरोमियोंची ताकत वाढते. त्यामुळे असे प्रसंग पुन्हा ओढाव्ाू शकतात. यासाठी तुम्ही मुलींनी पोलीस अधिकार्‍यांना फोन करुन माहिती दिल्यास पुन्हा रोडरोमियो निर्माण होणार नाहीत.’ असे सांगून त्यांनी पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे पो.नि. के.एन. नावंदे (मो.नं 9922031000)तर पंढरपूर तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि दिलीप जाधव (मो.नं. 9860518333) तसेच हेल्पलार्इन 1091 व 100 या क्रमांकावर आपण रोडरोमियोचे वर्णन त्यांनी वापरलेल्या वाहनाचे नंबर व ठिकाण आदी माहिती दिल्यास पोलिस तात्काळ रोडरोमियो, अपरीचीत इसमांचा शोध घेवून कारवार्इ करतील.’असेही शेवटी त्यांनी सांगितले
.
     युवती सुरक्षितेतच्या महत्वपुर्ण मार्गदर्शनानंतर शितल गोंडाल, शिवरंजणी दिवटे, सोनिया वाघमोडे, अर्चना नवले, सोनाली तोडकरी, प्रियदर्शनी देशमाने, कुमारी उज्वला, प्रा क्षीरसागर, प्रा. खांडेकर यांच्यासह आदींनी महिला सुरक्षतेबाबत अनेक प्रश्‍न उपस्थित केले. यावर पोलिस अधिक्षक मंडलिक व डी.वाय.एस.पी दुबुले यांनी सर्व शंकांचे निरसन करुन खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या. यानंतर काही विद्यार्थींनींनी सायंकाळच्या सुमारास एस.टी. न थांबविणे, तिकीटाचे उर्वरित पैसे देताना वाहकांची संभाषणाची भाषा अर्वाच्च असल्याच्या तक्रारी केल्या. यावर एस.पी.मंडलीक यांनी एस.टी आगार प्रमुखांशी यावर चर्चा करुन ठोस पावले उचलणार असल्याचे  सांगितले. यावेळी पोलिस उपविभागीय अधिकारी करांडे, एस.टी. वाहक वैशाली कुलकर्णी, अ‍ॅड. रजनी जाधव, प्राचार्य डॉ.एस.पी.पाटील, संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, डॉ. कुलकर्णी, पोलिस अधिकारी वर्ग, सांकृतिक विभाग प्रमुख प्रा. ए.जी. कोरके, अधिष्ठाता, प्राध्यापक वर्ग व जवळपास तीनहजाराहून अधिक विद्यार्थीनी उपस्थित होते.सुत्रसंचालन प्रा.यशपाल खेडकर यांनी तर अधिष्ठाता डॉ. श्रीदेवी यांनी आभार मांडले. 

छायाचित्र:-1.श्री.विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च इंन्स्टिट्युट पंढरपूर व सोलापूर जिल्हा ग्रामिण पोलिस दल यांच्या सयुक्त विद्यमाने ‘क्रांतीज्योती सावित्रीबार्इ फुले यांची जयंती व महाराष्ट्र पोलीस रेझींग डे’ निमित्ताने युवतींच्या सुरक्षा प्रश्‍नांबाबत आयोजलेल्या कार्यक्रमात विद्यार्थींनींना सुरक्षिततेविषयी मार्गदर्शन करताना पोलिस अधिक्षक दत्तात्रक मंडलिक सोबत डावीकडून पोलिस उपविभागीय अधिकारी करांडे, सचिव व इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, डी.वाय.एस.पी दुबुले, संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, पो.नि. के.एन. नावंदे, पो.नि दिलीप जाधव व आदी. 2.दिपप्रज्वलन करताना पोलिस अधिक्षक दत्तात्रक मंडलिक सोबत डावीकडून अध्यक्षा सुजाता यादगिरी, सचिव व इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल व आदी.  3.महिला सुरक्षतेबाबतीत समस्या मांडताना विद्यार्थींनी. 4.‘क्रांतीज्योती सावित्रीबार्इ फुले यांची जयंती व महाराष्ट्र पोलीस रेझींग डे’ कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी



%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%%


बघत रहा "पंढरपूर लाईव्ह"


"पंढरपूर लाईव्ह ई-न्यूज वेब पोर्टल" च्या वाचकांची संख्या 4 जानेवारी 2015 रोजी  38, 176  एवढी आहे... "पंढरपूर लाईव्ह" हे अँन्ड्राँईड अँप सुरू करून अवघा एक महिना झाला.... याच्या विविध वैशिष्टयांमुळे आत्तापर्यंत

   4 जानेवारी 2015 रोजी तब्बल 1985 अँन्ड्राँई मोबाईलधारकांनी हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले ...  या सर्वांचे अभिनंदन आणि आभार..!.


पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप ची सेवा मोफत असून विविध ताज्या बातम्या, रेल्वे वेळापत्रक, श्री विठ्ठल रूक्मिणी चे आँनलाईन दर्शन, पंढरपूर व सोलापूर मधील विविध शासकीय कार्यालयीन क्रमांक, वधुवर सुचक, पंढरपूरमधील व्यावसायीक व आणखी बरेच काही यामध्ये आपणास पहायला मिळेल....

पंढरपूर लाईव्ह चे अँन्ड्राँईड अँप एकवेळ अवश्य पहा


ज्यांनी अजूनही हे अँप आपल्या मोबाईलमध्ये घेतले नाही त्यांनी खालील लिंक वर क्लीक करून गुगल प्ले स्टोअरमधून ते घ्यावे... ही नम्र विनंती

http://market.android.com/search?q=pname%3Acom.wPandharpurLive

 


आपला :-- भगवान वानखेडे (संपादक)

मोबा. नं.  8055434499  /  8308838111
 

  आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com


 

Post a Comment

0 Comments