पुढील 10 वर्षांचे नियोजन करावे शहरांच्या विकासासाठी योग्य नियोजन करावे -मुख्यमंत्री

पंढरपूर लाईव्ह:-

दि. 7 फेब्रुवारी, 2015

मुंबई, दि.7 : नागरी क्षेत्राची झपाट्याने वाढ होत असल्याने या भागातील नागरिकांना

चांगल्या सुविधा देण्यासाठी महानगरपालिकांनी  योग्य नियोजन व विकास आराखडा आखून  उत्तम शहरे निर्माण करण्याचे काम करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे कन्सलटेटिव्ह वर्क शॉप ऑन अर्बन गर्व्हनन्स या एक दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू, केंद्र शासनाच्या नगरविकास विभागाचे सहसचिव प्रविण प्रकाश, अतिरिक्त सचिव दुर्गा शंकर मिश्रा, एमएचयूपीएच्या सचिव नंदिता चॅटर्जी, राज्याच्या नगरविकास सचिव मनिषा म्हैसकर तसेच राज्यातील महानगरपालिकांचे आयुक्त ,वरिष्ठ शासकीय मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नागरी विकासासाठी त्या त्या क्षेत्राला उपयुक्त आणि योग्य होईल अशा प्रकारे नियोजन केले तर त्या भागातील नागरिकांचे जीवन समृध्द होऊ शकेल.


महानगरपालकांनी त्यांच्या क्षेत्राला उपयुक्त ठरेल आणि त्यांची अंमलबजावणी करणे सुलभ होईल अशा प्रकारे विकास आराखडयाचे नियोजन करावे. शहरांचा उत्तम विकास होण्यासाठी  नगरविकासातील संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजवावी.  जेएनएनयुआरएम मधील काही थांबलेले प्रकल्प नागरी विकासासाठी सुरु करणे आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र शासनाने या कामी  मदत करावी असे सांगून मुख्यमंत्र्यांनी कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.

श्री. नायडू यावेळी म्हणाले की, नगरविकासाची कामें करताना पारदर्शकता ठेवणे अत्यंत
महत्त्वाचे आहे.  नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महानगरपालिकांनी प्रयत्न करावेत, प्रत्येक महापालिकेने 2025 चे व्हिजन डाक्यूमेंट तयार करुन पुढील 10 वर्षाची  योजना करावी. शहरातील नागरिकांना उत्तम सुविधा, यामध्ये चांगली वाहतूक व्यवस्था, परवडणारी घरे, वीज, पाणी मिळाले पाहिजे. अनेक कामे ऑनलाईन झाली पाहिजेत. भविष्यात महापालिकांनी सौर ऊर्जा निर्माण करण्याची उद्दिष्टे ठेवावीत. रेन वॉटर हार्वेस्टींग, पाण्याचा पुर्नवापर आणि पाण्यासाठी मीटर लावणे अशा पध्दतीने नियोजन करावेत.  महापालिकांचा गुणानुक्रम ठरवून त्यानुसार त्यांना निधी मंजूर करण्यात येईल.  स्थगित जेएनएनयुआरएम प्रकल्प केंद्र शासन पूर्ण स्वच्छ भारत अभियानांतर्गत निधीचा पहिला टप्पा आज महाराष्ट्र, गुजरात, गोवा, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांना श्री.नायडू यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. स्वच्छ भारत अभियान हे जन आंदोलन झाले पाहिजे यासाठी लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वच्छतेविषयी जागृती करणे आवश्यक आहे.असेही श्री.नायडू यांनी सांगितले.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

 

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 8 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 51 हजार 739 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 714 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Post a Comment

0 Comments