पंढरपूर लाईव्ह- दि. 28 फेब्रुवारी 2015
सर्वसामान्यांचं जगणं सुसह्य आणि सुखकारक करु असे सांगणार्या जेटली यांनी उद्योग क्षेत्रांना करकपातीची गिप्ट तर मध्यमवर्गीयांना सेवा कर वाढवून खुप मोठा झटका दिला आहे. जेटलींच्या या झटक्यामुळं मोबाइल, हॉटेलिंगपासून ते शॉपिंगपर्यंतच्या सर्व सेवा आणि पर्यायानं महागाई वाढणार आहे. एक कोटींपेक्षा अधिक इन्कम असलेल्या श्रीमंतांच्या खिशात हात घातल्याचं दाखवणार्या अर्थमंत्र्यांनी इन्कम टॅक्स ’जैसे थे’ ठेवून मध्यमवर्गीयांचा सपशेल अपेक्षाभंग केला.
’अच्छे दिन’चा नारा देत सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात हंगामी अर्थसंकल्प सादर केला होता. मात्र, त्यासाठी अत्यंत कमी कालावधी मिळाल्यानं यंदाच्या संपूर्ण अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांना बर्याच आशा होत्या. तेलाचे घसरलेले दर, परकीय चलनाची वाढलेली गंगाजळी, महागाईचा घटता दर अशा पार्श्वभूमीवर अर्थसंकल्प मांडणारे जेटली सर्वसामान्यांना देशातील अनुकूल आर्थिक स्थितीचा फायदा करून देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली.
पगारदारांना इन्कम टॅक्समध्ये प्रत्यक्ष एका पैशाचीही सूट देण्यात आलेली नाही. त्याऐवजी वेगवेगळ्या गुंतवणुकीवर असलेल्या सवलतीची मर्यादा वाढविण्यात आली आहे. आरोग्य विम्यातील गुंतवणुकीवरील कर सवलतीची मर्यादा 15 हजारांहून 25 हजार करण्यात आली आहे तर, पेन्शनमधील करमुक्त गुंतवणुकीची मर्यादा 50 हजाराने वाढविण्यात आली आहे. मात्र, या सवलती गुंतवणुकीशी संबंधित असल्याने करदात्यांना त्याचा थेट फायदा होणार नाही. एकीकडे मध्यमवर्गीयांना कोणताही थेट फायदा न देता सेवाकर 12.36 वरून 14 टक्क्यांवर नेण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. त्याचा थेट परिणाम महागाईवर होणार असून घरं व औषधांपासून सर्व प्रकारची महागाई वाढणार आहे. त्यामुळे मध्यमवर्गीयांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
कॉर्पोरेटला गिफ्ट
मोदी सरकार हे प्रत्यक्षात ’उद्योगपती आणि श्रीमंतांचे सरकार’ असल्याच्या होणार्या टीकेची पर्वा न करता अर्थमंत्री जेटली यांनी आजच्या बजेटमध्ये कॉर्पोरेटला करकपातीचे गिफ्ट दिले. कॉर्पोरेट टॅक्स 30 टक्क्यांवरून 25 टक्के करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. या निर्णयामुळं उद्योगांना चालना मिळून रोजगार वाढण्यास मदत होईल, असा दावा जेटली यांनी केला.
******
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 28 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 66 हजार 260 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 540
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 28 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 66 हजार 260 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 540 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

















0 Comments