करकंब येथे बाल विज्ञान मेळावा संपन्न
फोटो
:- करकंब येथील बाल विज्ञान मेळाव्यात विद्यार्थ्यांनी केलेल्या वस्तुंचे
निरीक्षण करताना प्रा. साळुंखे, प्रसाद शेटे, मुख्याध्यापक हेमंत कदम,
पर्यवेक्षक प्रदीप कुलकर्णी मनिषा माईनकर, सौ.राजश्री शिंदे व इतर.
(छाया-संतोष डिजीटल, करकंब)
पंढरपूर लाईव्ह- करकंब दि. 28 फेब्रुवारी 2015
(गोपीनाथ देशमुख यांजकडून):- ‘‘विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविणे ही प्रत्येक शाळेची जबाबदारी असून शाळांनी बालविज्ञान मेळाव्यासारख्या कार्यक्रमाचे आयोजन करणे आवश्यक असल्याचे मत सोलापूर विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक प्रा. डॉ. दादासाहेब साळुंखे यांनी व्यक्त केले. ते करकंब येथील रामभाऊ जोशी हायस्कुल येथे विज्ञान दिन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बालविज्ञान मेळाव्यात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून युनियन बँकेचे मोडनिंब शाखा प्रबंधक प्रसाद शेटे तर प्रमुख पाहुणे म्हणून करकंब चे केंद्रप्रमुख दत्तात्रय खंदारे, मुख्याध्यापक हेमंत कदम, पर्यवेक्षक प्रदीप कुलकर्णी आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. साळुंखे यांनी विद्यार्थ्यांनी आयुष्यामध्ये ध्येय निश्चित करुन त्याकडे वाटचाल करावी व विज्ञाननिष्ठ होऊन आपल्या जीवनाची वाटचाल करावी हे सांगत असताना त्यांनी डॉ.सी.व्ही. रमण, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती देवून या थोर शास्त्रज्ञांचे विचार अंगीकारण्याचे आवाहन केले. ग्रामीण भागात अशा बालविज्ञान मेळाव्याची गरज असल्याचे सामगून प्रशालेने राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक त्यांनी केले.
अध्यक्ष स्थानावरुन बोलताना युनियन बँकेचे शाखा प्रबंधक प्रसाद शेटे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष, शरीर प्रकृती सदृढ ठेवावी कारण अभ्यास प्रगती करत असताना आपल्या शरिराची साथ महत्वाची असते. असे सांगुन शाळांनी विद्यार्थ्यांमध्ये शारिरीक कौशल्य निर्माण करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रशालेमध्ये दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी बालविज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी प्रशालेतील 80 विद्यार्थ्यांनी आपली विविध उपकरणासह या मेळाव्यात आपला सहभाग नोंदविला. यामध्ये सौरउर्जा, हवेवर चालणारी उपकरणे, मानवी शरिरारचनेबाबत माहिती देणारी उपकरणे यांचा समावेश असल्याची माहिती मुख्याध्यापक हेमंत कदम यांनी दिली. प्रशालेतून सन 2014-15 या शैक्षणिक वर्षात विज्ञान विषयाशी संबंधीत विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्रांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच प्रदीप कुलकर्णी, धनवंत करळे, एम. के. पुजारी, मनिषा माईनकर या विज्ञान शिक्षकांसह प्रयोगशाळा सहाय्यक माधव कांबळे यांचा विशेष सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या विज्ञान मेळाव्यास परिसरातील पालक, ग्रामस्थ, शिक्षक, प्राथमीक शाळा, मुख्याध्यापक, शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी भेट देवून विविध प्रयोगाची पहाणी केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय मळेगावकर यांनी केले. तर आभार अभिषेक चोपडे यांनी मानले.
******
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 28 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 66 हजार 064 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार504
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 28 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 66 हजार 064 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार504 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

















0 Comments