प्रथम वर्ष अभियांत्रिकीच्या पालक मेळाव्यात 300 पालकांचा सहभाग
पंढरपूर लाईव्ह:-
पंढरपूर - आपले विद्यार्थी हे प्रथम वर्ष परिक्षेच्या निकालात सोलापूर विद्यापीठात यशस्वी ठरले असून आमच्या मुलांवर या ठिकाणी चांगले संस्कार होताहेत. विद्यार्थ्यांनी आपले आदर्श निर्माण करावयाचे असतील तर गुरुजन वर्गावर विश्वास ठेवून त्यांचे अध्यापन कार्य आत्मसात करावे कारण येथील शिक्षकांमधून उत्तम कल्पकता दिसून येते.अभ्यासाचे स्वरुपात विविध संकल्पना राबवित असल्यामुळे तसेच विद्यार्थ्यासाठी ज्यादा अभ्यास घेतल्यामुळे कदाचित आमच्या पाल्यांना उज्वल यश मिळाले आहे’ अशी कबुली फलटन महाविद्यालयाचे प्रा. संभाजीराव शिंदे यांनी दिली.
येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च
इंन्स्टिटयुटच्या प्रथम वर्ष इंजिनिअरिंग (पदवी) मध्ये आयोजिलेल्या पालक
मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून प्रा. शिंदे उपस्थित
पालकांना मार्गदर्शन करत होते.दिपप्रज्वलनानंतर प्रथम वर्ष इंजिनिअरिंगचे
विभाग प्रमुख डॉ. एस.ए. लेंडवे यांनी प्रास्ताविकात पालक मेळावा भरविण्याचा
हेतू स्पष्ट करुन या विभागाची सपुर्ण माहिती देताना उपलब्ध साधन सामुग्री
1024 एम.बी.पी.एस. अर्थात 1 गिगा बाईट क्षमता असलेली इंटरनेट सुविधा तसेच
महाविद्यालयीन परिसरात वाय फाय इंटरनेट सुविधा, परिपुर्णतेकडे वाटचाल
करणारे ग्रथंालय,उच्च शिक्षित प्राध्यापक वर्ग, प्रत्येक वर्षी वाढत
जाणार्या गुणवत्तेचा आलेख, वर्कशॉप, प्रात्यक्षिकाकरिता अत्याधुनिक
उपकरणे, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकरता सोय व्हावी व त्यांना कोणत्याही
प्रकारच्या अडचणी येवू नयेत या करता मुलामुलीसाठी स्वतंत्र असणार्या
वस्तीगृहाची सोय व सुविधा, 24 तास पाणी व अखंड विद्युत पुरवठा,ए.टी.एम.ची
सुविधा, प्राणायम, रात्र अभ्यासिका, व्यायाम शाळा, कॅटींन, शहरातील
विद्यार्थ्यांसाठी वाहतुकीचा व्यवस्था, गरीब व होतकरु विद्यार्थ्यासाठी
कमवा शिका योजनेसह आदी सुविधांची सविस्तर माहिती दिली.

संशोधन विभागाचे
अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी संशोधनाकरिता मिळालेला निधी या
संशोधनामुळे विद्यार्थी, ग्रामीण भागातील नागरिक व शेतकर्यांना
भविष्यकाळात होणारा फायदा, प्रा. यशपाल खेडकर यांनी मेकॅनिकल विभाग,
प्रा.एस. व्ही. दर्शने यांनी कॉम्प्युटर सायन्स विभाग तर प्रा. एम.आय.
बोहरी यांनी सिव्हील विभागाची महत्वपुर्ण माहिती दिली. ट्रेनिग अॅण्ड
प्लेसमेंटचे प्रा. पी.डी. बनसोडे यांनी प्रथम वर्ष अभियांत्रिकीमध्ये
विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यापासुन अभियांत्रिकीचे अंतिम वर्ष पुर्ण
होईपर्यंत आणि त्या नंतर विविध नांमाकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
कंपन्यांमध्ये कॅम्पस इंटरव्हूवद्वारे नोकरीमध्ये येणार्या विविध अडचणी,
संभाषण कौशल्य यावर मार्गदर्शन करताना विद्याथ्यार्ंंची जडणघडण, गेट
परिक्षेची तयारी, त्यांची भाषाशैली, शिस्त, वेशभुषा कशी असावी? याबाबत
मार्गदर्शन केले. त्याच बरोबर विविध नामांकित कंपन्यांमध्ये कॅम्पस
इंटव्हुव्हद्वारे निवड झालेले विद्यार्थी व त्यांना मिळणार्या वार्षीक
वेतनाचे पॅकेज या विषयी माहिती सादर केली. महिला पालक प्रतिनिधी म्हणून
बोलताना डॉ. शैलजा गुजर म्हणाल्या,डॉ. रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली
प्राध्यापक वर्ग विद्यार्थ्यांना घडवित आहेत. पण पाल्यांवर पालकांचे लक्ष
असू दया. वेळ प्रसंगी शिक्षक विभागप्रमुख व प्राचार्य यांच्याशी संपर्क
साधून पाल्यांच्या प्रगतीची खात्री करुन त्याच्या विकासासाठी हातभार
लावावे.’ असे आवाहन ही डॉ. गुजर यांनी केले. रात्र अभ्यासिका व अभ्यासाचे
ज्यादा तास’ हा यशस्वी प्रयोग केवळ प्रथम वर्षातील विद्यार्थ्यासाठीच न
राबविता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांपर्यंत अविरत चालू ठेवण्याची मागणी
देखील यावेळी पालकांनी आवर्जुन केली. या पालक मेळाव्यात महाराष्ट्रातील
विविध जिल्हयातून जवळपास 300 पालक उपस्थित होते. यामध्ये एम.ए. मेटकरी,
बळीराम नांगरे विलास देषपांडे, सुवर्णा जाधव, राजेंद्र ठोकळे, करमाळकर,
प्रसाद ठाकरे, मंदाकीनी देवमारे, सदाशिव माने, प्रगती शहाणे या पालकांनी
सुचना व प्रश्न मांडले. त्या सर्वांची संस्थेचे संस्थापक सचिव व
अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी नोंद घेवून काही प्रश्न
जागेवरच सोडविले. तर काही प्रश्न अल्पश: कालावधीत सोडविण्याची ग्वाही
दिली. या मेळाव्यात यंदाच्या वर्षी सोलापूर विद्यापीठात प्रथम आलेल्या,
विषयवार गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देवून गौरविण्यात आले. पालक
मेळाव्यानंतर पालकांनी विविध विभाग, प्रात्याक्षिक वर्ग, आपल्या पाल्याचे
संबंधीत प्राध्यापक वर्ग आदींची प्रत्यक्ष भेट घेवून वस्तुस्थितीची पाहणी
करुन समाधान व्यक्त केले. पाल्यांच्या अभ्यासाविषयी शंका निरसण ही करुन
घेतले यावेळी प्रथम वर्ष इंजिनिअरिंगचे सर्व प्राध्यापकवृंद, अधिष्ठाता
डॉ.एस.एम.मुकणे, वसतिगृह व्यवस्थापक प्रा.एम.एम.पवार, उपस्थित होते.
अधिष्ठाता डॉ. एम.एम.पाटील यांनी उपस्थितांचे आभार मांडले.छायाचित्र:-
1.श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इंन्स्टिटयुटच्या प्रथम वर्ष इंजिनिअरिंग(पदवी) मध्ये आयोजिलेल्या पालक मेळाव्याचे उद्घाटन करताना फलटन महाविद्यालयाचे प्रा. संभाजीराव शिंदे सोबत डावीकडून डॉ. लेंडवे, डॉ. मुकणे, संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, डॉ. गुजर, डॉ. एम.एम.पाटील.
2. उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना प्रा. संभाजीराव शिंदे व आदी.
3.व 4.सोलापूर विद्यापीठात प्रथम आलेल्या व विषयवार गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देवून गौरविताना पालक प्रतिनिधी प्रा. संभाजीराव शिंदे, महिला पालक प्रतिनिधी डॉ. शैलजा गुजर व आदी.
5. उपस्थित पालकांना मार्गदर्शन करताना महिला पालक प्रतिनिधी डॉ. शैलजा गुजर व आदी.
*
*******
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 28 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 66 हजार009 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 504
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 28 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 66 हजार009 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 504 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

















0 Comments