पंढरपूरमध्ये चाकुने भोसकून तरुणाचा खुन

पंढरपूर लाईव्ह:- 

दि. 27 फेब्रुवारी 2015

पंढरपूरमध्ये चाकुन भोसकून एका तरुणाचा खुन झाल्याची धक्कादायक घटना काल दि. 26/2/2015 रोजी रात्री 10 वाजणेच्या सुमारास घडली आहे. वरातीमध्ये नाचताना धक्का लागल्याचा राग आल्याने पाच सहा  तरुणांच्याकडून हा अपराध घडला.

याबाबत शहर पोलिस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, दि. 26 फेब्रुवारी 2015 रोजी रात्री 10 वाजणेच्या सुमारास पंढरपूर शहरातील बेंलोरकर मठासमोरील रोडवर वैभव भारत शिर्के, डुम्या उर्फ संदेश शरद शिर्के, शक्ती पिंटू शिर्के व त्यांचे 3 ते 4  जवळील लोक सर्व रा.भाई भाई चौक गोंधळी गल्ली समाज मंदिराजवळ, पंढरपूर या सर्वांनी संगनमत करुन बेकायदा जमाव जमवून वरातीत नाचताना सुधिर प्रकाश मोरे (वय-21) रा. बडवेचर झोपडपट्टी, दत्त मंदिराजवळ, संतपेठ, पंढरपूर याचा वैभव भारत शिर्के यास धक्का लागण्याचे कारणावरुन  त्याचा राग मनात धरुन डुम्या उर्फ संदेश शरद शिर्के, शक्ती पिंटु शिर्के व इतर 3 ते 4 साथीदारांनी सुधीर  यास धरुन लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व वैभव भारत शिर्के याने त्याचे खिशातील चाकु काढुन सुधीरचे डावे बरगडीत खुपसुन गंभीर जखमी करुन त्याचा खुन केला आहे.
फिर्यादी दिपक प्रकाश मोरे यांनी भारत शिर्के, डुम्या उर्फ संदेश शरद शिर्के, शक्ती पिंटु शिर्के व त्यांचे इतर 3 ते 4 साथीदार यांचे विरुध्द फिर्याद दिल्याने पंढरपूर शहर पोलिस ठाणे भाग-5 गुरनं 36/2015 भादवि कलम 302, 143, 647, 148, 1449  आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक चं. देशमुख हे करीत आहेत.
आज सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता दि. 4 मार्च 2015 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती मिळाली.

* *******

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 27  फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या                62 हजार 201 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 913   च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 









 

 

 

 


Post a Comment

0 Comments