अ.भा. छावा मराठा युवा संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य शिव पालखी सोहळा संपन्न

पंढरपूर लाईव्ह :-  दि. 19 फेब्रुवारी रोजी येथील अ.भा. छावा मराठा युवा संघटक व अ.भा. छावा विद्यार्थी सेना यांच्या वतीने शिवछत्रपतींची 385 वी जयंती मोठ्या
उत्साहात व विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.  यावेळी अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या 15 वा वर्धापन दिनानिमित्त पंढरपूरमध्ये भव्य ‘शिव पालखी’ ची भव्य मिरवणुक शहरातून काढण्यात आली.




पालखीतील छत्रपती शिवरायांच्या शिवमुर्तीचे पुजन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी खांद्यावर भगव्या पताका घेवून हजारो शिवभक्त या  मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झालेले आढळले. तरुणाईच्या जयशिवराय च्या जयघोषाने पंढरी दुमदुमून गेली होती. एकुणच सर्व पंढरपूर शहर पुर्णपणे शिवमय झालेले
आढळले. यावेळी  माजी उपनगराध्यक्ष नागेशकाका भोसले, राष्ट्रवादीचे संदिप मांडवे, छावा युवक संघटनेचे सागर कदम, नगरसेवक नामदेव भुईटे, यांच्यासह अनेक मान्यवर व शिवप्रेमी

उपस्थित होते.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 








 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 20 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 55 हजार 912 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 168 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Post a Comment

0 Comments