करकंबमध्ये विविध ठिकाणी शिवजन्मोत्सावानिमित्त छत्रपती शिवरायांना मानवंदना शिवप्रेमीमध्ये उत्साहाचे वातावरण

पंढरपूर लाईव्ह (गोपीनाथ देशमुख यांजकडून):-  करकंब ता. पंढरपूर येथे दि. 19 फेब्रुवारी 2015 रोजी करकंब ग्रामपंचायतीच्या वतीने शिवजन्मोत्सवानिमित्त शिवप्रतिमेचे पुजन करुन छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. करकंब ग्रामपंचायतीच्या सरपंच  सौ. रोहिणी वंजारी, नागेश वंजारी, उपसरपंच आदिनाथ देशमुख यांचे हस्ते शिवप्रतिमेचे पुजन करण्यात आले.

यावेळी प्रदिप खंकाळ, विजय मस्के, दत्ता यंपे, विशाल देशमुख व ग्रामसेवक एस.एम. यादव तसेच करकंब परिसरातील अनेक शिवप्रेमी उपस्थित होते.

थोरली वेस येथे भव्य शिवमुर्तीचे पुजन युनियन बँकेचे मोडनिंब शाखा मॅनेजर प्रसाद शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांचा सत्कार भागवत पलंगे यांनी केला. यावेळी शिवप्रतिमेचे दर्शनासाठी बहुसंख्य शिवप्रेमी उपस्थित होते. यावेळी अमोल शेळके, संजय जगताप, अतुल अभंगराव, सुधीर झिरपे, अमर चव्हाण, शिवाजी व्यवहारे, औदुंबर कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
करकंब बसस्थानक येथे ही छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन उपसरपंच श्री. अदिनाथ देशमुख  यांच्या  हस्ते संपन्न झाले. सोमवारपेठ, थोरलीवेस, अभिमान नगर, नेमतवाडी चौक याठिकाणीही शिवप्रेमींनी मोठ्या उत्साहात शिवप्रतिमेचे पुजन करुन फटाक्यांची आतिषबाजी केली.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 








 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 20  फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 55 हजार 810  च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 161 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.


Post a Comment

0 Comments