संगणक शिक्षकांच्या समस्या वाढल्या... अन्याय दुर करण्याची मागणी

पंढरपूर लाईव्ह- 28 फेब्रुवारी 2015

आसीटी योजनेअंतर्गत शासकीय धोरण राबविले गेले. राज्यातील अनेक शाळेत आठ संगणक शिक्षक नेमण्यात आले मात्र या शिक्षकांना दरमहा समान वेतन देणे व इतर बाबीमध्ये तफावत आढळत असुम अन्याय होत असणार्‍या संगणक शिक्षकांना न्याय मिळावा अशी मागणी होत आहे.


राज्यातील संगणक शिक्षकांवर कंत्राटी पध्दतीने या शिक्षकांची नेमणूक करणार्‍या कंपन्याकडून  अशा प्रकारचा अन्याय होत असून हा अन्याय दुर व्हावा अशी मागणी शिक्षक संघटनेचे सचिव जीवन सुरुडे यांनी
केंद्र सरकारने इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्याची योजना सहा वर्षापूर्वी सुरु केली. त्यांची कंत्राटे विविध कंपन्यास देण्यात आली. कंपन्यांच्या वतीने कंत्राटी पध्दतीने राज्यात आठ हजाराहून अधिक संगणक शिक्षक नेमण्यात आले. त्यांना समान वेतन देणे, भविष्य निर्वाह निधी कपात करणे, वेतन चिठ्ठी देणे बंधनकारक असतानाही कंपन्यांनी त्यांचे कायदेशीर उल्लंघन केले, असा आरोपही त्यांनी केला. संगणक शिक्षकांना सेवेत कायम करावे, संगणक शिक्षकांच्या वेतनातील फरक द्यावा, भविष्य निर्वाह निधी जमा करावा, जिल्हा शिक्षण अधिकार्‍यांकडे नियंत्रण द्यावे आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत.
शालेय सचिवांकडे केली आहे.

संगणक शिक्षक- काळाची गरज

राज्य शासनाने 2013-14 या वर्षात राज्यातील 5 हजार माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळामध्ये बूट मॉडेल (बिल्टॉन ऑपरेट अँण्ड ट्रान्सफर) पध्दतीने पाच वर्षासाठी आय.सी.टी. टप्पा तिसरी योजना हाती घेतली. सोलापूर जिल्हयात 800 आसपास माध्यमिक शाळा आहे. तसेच विज्ञान विभाग असलेल्या 22 महाविद्यालचे जिल्हयात आहेत. त्यापैकी तिसर्‍या टप्प्याचा अखेर 33 शाळा तसेच महाविद्यालये संगणकीय प्रयोगशाळांनी सुसज्ज झाले असून उर्वरित शाळांना चौथ्या टप्प्यात ही योजना राबविण्यात येणार असून पाच वर्षात संपूर्ण संगणकीय प्रयोगशाळा निर्माण झालेल्या आढळतील. या योजनेंतर्गत प्रत्येक संगणक प्रयोग शाळेसाठी पूर्णवेळ प्रशिक्षित निदेशक, प्रयोग शाळा कार्यान्वित करण्यासाठी होणारा सर्व खर्च, विद्युत, इंटरनेट, स्टेशनरीसाठीचा खर्च शासनाकडून भागविला जात आहे. या शाळेचा लाभ इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. दररोज किती विद्यार्थी, शिक्षक यांना किती वेळा लाभ झाला याची माहिती ठेवावी लागणार असल्याने एकही विद्यार्थी या संगणक प्रयोग शाळेत गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच संगणक शिक्षक ही काळाची खरी गरज आहे... एवढे मात्र निश्‍चित.

*****

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 28  फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या                66 हजार 277 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 540 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 









 

 

 

 

Post a Comment

0 Comments