कष्टकर्‍यांच्या पेन्शनसाठी सरकारला जाब पंढरपुरात आयोजित राष्ट्रीय पेन्शन परिषदेत इशारा

पंढरपूर लाईव्ह- 29 फेब्रुवारी 2015

। पंढरपूर,

युष्यभर काबाड कष्ट केल्यानंतर म्हातारपणाला किमान आधार मिळावा याकरिता पेन्शन मिळणं हा कामगार,कष्टकर्‍यांचा अधिकार आहे. आणि तो मिळत नसेल तर आता लढावेच लागणार आहे. अच्छे दिन आणण्याचे आश्‍वासन देऊन सत्तेवर आलेल्या या सरकारला  पेन्शन द्या नाही तर सत्ता सोडा असा जाब विचारा असे आवाहन मजदुर किसान शक्ती संघटनेच्या प्रमुख डॉ. अरूणा रॉय यांनी केले. 

 पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्य हमाल, मापाडी महामंडळाने आयोजित केलेल्यरा राष्ट्रीय पेन्शन परिषदेत त्या बोलत होत्या. महामंडळाचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव या परिषदेच्या अध्यक्षस्थानी होते. 
यावेळी पुढे बोलताना रॉय म्हणाल्या की, सध्या देशात गरीबांची चेष्टा चालू आहे. गरीबांच्या पेन्शनची तरतूद 10 हजारांवरून 9 हजारांवर कमी केली. एका बाजुला आपण पेन्शनसाठी भांडत आहोत तर दुसर्‍या बाजुला सरकारने पेन्शनवरील तरतूद कमी केली. लोकसभा, विधानसभा निवडणूकीत जे मते मागून निवडूण गेले
Add caption
आता त्यांच्या दारात जाऊन आमच्या पेन्शनचे काय केले असा जाब विचारा. अन्यथा देशभर लढावे लागेल असाही इशारा रॉय यांनी दिला.  अध्यक्षीय भाषणात डॉ.बाबा आढाव म्हणाले की, 2005 पासून पेन्शनची लढाई सुरू आहे. तीला यश मिळत आहे. दिल्लीत हमाली, मापाडी व तोलारचे काम करणार्‍यांना एक हजार रुपयाची पेन्शन दिली जाते. गोव्यात ती 2 हजार रूपये आहे.  महाराष्ट्रातील हमालांनाही पेन्शन दिली जावी, पेन्शन दिली नाही तर लढा अधिक तीव्र करावा लागेल. 12 मार्च रोजी नागपुर येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानला घेराव घालण्याचा इशारा देऊन डॉ. आढाव पुढे म्हणाले की, सरकारने जाहीर केलेले जमीन अधिग्रहण विधेयक शेतकर्‍यांविरोधी आहे, आजच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात पेन्शनच्या तरतुदीमध्ये कपात केली आहे. एप्रील महिन्यात दिल्लीत पुन्हा पेन्शनसाठी आंदोलन उभा केले जाणार असल्याचेही डॉ. आढाव यांनी यावेळी सांगीतले. 
या परिषदेस राज्यभरातून सुमारे 10 हजारांपेक्षा जास्त हमाल,तोलार, मापाड, महिला उपस्थित होते. 


 तत्पुर्वी सकाळी पंढरपुरातून सर्व उपस्थित हमाल, कामगारांची भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीस 10 हजारांवर कामगार उपस्थित होते. यावेळी एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक, मजदूर, किसान शक्ती संघटनेच्या डॉ. अरुणा रॉय, दिल्ली हमाल पंचायत निमंत्रक प्रकाश कुमार, निखील डे, जिल्हा उपाध्यक्ष नागनाथ खंडागळे, सभापती दाजी भुसनर, माजी उपसभापती लक्ष्मण धनवडे, विष्णु रेडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रकाश कुमार, सभापती दाजी भुसनर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक व सुत्रसंचालन जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी केले.

*****

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 28  फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या                67 हजार 054 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 634 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 









 

 

 

 

Post a Comment

0 Comments