बारामती बँकेच्या सभासदांपैकी 12977 सभासदांपैकी 1400 कर्जदार थकबाकीदार कोण हे पाहूनच सभासदांनी मतदान करावे-डॉ. विजयकुमार भिसे

पंढरपूर लाईव्ह

बारामती दि. 1 एप्रिल 2015

बारामती सहकारी बँकेचे एकूण 12977 सभासद असुन त्यापैकी थकबाकीदार सभासद 1400 च्या वर असल्याने सहकार कायद्याप्रमाणे मतदानास थकबाकीदार सभासद अपात्र आहेत. मतदानास पात्र 11548 सभासद आहेत. जवळपास एकूण सभासदांच्या 12 टक्के सभासद हे थकबाकीदार आहेत. थकबाकीदारांच्या यादीत कोण लोक आहेत त्यांची संख्या जास्त असल्याने संचालक मंडळाने वसुली अधिकार्‍यांना वसुली करण्यासाठी पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कर्जदारांची संचालक मंडळाने वसुली कारवाई करण्यास असमर्थ ठरले का? असा प्रश्‍न निर्माण होतो. 1400 थकबाकीदारांची रक्कम किती आहे हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही त्यामुळे सभासदांनी मतदानापूर्वी विचार करुन मतदान करावे असे आवाहन उमेदवार डॉ. विजयकुमार  रामचंद्र भिसे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

दि. बारामती सहकारी बँक मर्यादित बारामती ची संचालक मंडळाची निवडणुक 2015-20 जाहीर झाली असुन या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार अजित पवार यांनी निवडणुक बिनविरोध करण्यासाठी इच्छूक व पात्र उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुलाखतीच्या नावाखाली सह्या घेतल्या व उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी  उमेदवारांचे प्रतिनिधी नेमण्यासाठीही सह्या घेतल्या, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी उमेदवारांना माहिती न होता गुपचुपपणे उमेदवारी अर्ज मागे घेतले. कोणत्याही इच्छऐज उमेदवाराला आपला प्रतिनिधी कोण हे कळु दिले नाही. त्यासाठी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. निवडणुक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला परंतू अजित पवार यांना बारामती बँकेची निवडणुक बिनविरोध करण्यात अपयश आले. बारामती बँकेसारख्या आर्थिक संस्थेत लोकशाही पध्दतीने निवडणुक झालीच पाहिजे असे सभासद म्हणून माझे मत आहे असे श्री. भिसे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात नमुद केले आहे.


बारामती सहकारी बँकेचे एकुण 12977 सभासद असून  थकबाकीदार सभासद हेे सहकार कायद्यान्वये मतदानास अपात्र आहेत. असे 1429 सभासद आहेत. मतदानास पात्र 11548 सभासद आहेत. बारामती बँकेचे कार्यक्षेत्र राज्य असले तरी चार जिल्ह्यात 23 च्या वर शाखा असल्याची माहितीही श्री. भिसे यांनी या पत्रकान्वये दिली आहे.    

*****

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 1 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   67 हजार 107 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 637 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 









 

 

 

 

Post a Comment

0 Comments