शिवभक्त प्रतिष्ठानच्या नित्यपुजा संकल्प उपक्रमास वर्षेपुर्ती

पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर:-शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपुर यांच्या वतीने अखंड 365 दिवस पंढरपूर शहरातील शिवतिर्थावरील श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे नित्यपुजन संकल्प अभियानास एक वर्षे पुर्ण झाले असुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याबरोबर श्री.संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे ही पूजन वर्षेभर करण्यात येत आहे.


2014 शिवजन्मोत्सवा दिवशी संकल्प सोडण्यात आला होता अनेक शिवभक्तांच्या शिवविचारातुन पुतळ्यांचे पुजन, स्वच्छता, देखभाल यासाठी या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुजेचा मान सुलभ रितीने सर्व शिवभक्तांना मिळावा. शिवतिर्थावरील अश्वारूढ पुतळ्यांचे पुजन नित्य शिवभक्त प्रतिष्ठनच्या प्रेरणेतुन होत आहे. दररोज नित्य पुजेसाठी 10 ते 15 शिवभक्त उपस्थित राहुन स्वत:च्या व्यक्तीगत विकासाबरोबर व्यसनमुक्ती शपथ देशभक्तीची शपथ घेवून शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्क होणारा आदर्श या माध्यमातुन घडावा तसेच 15-16 वर्षामधील या युवकांनी या नित्यपुजा संकल्प अभियानाचा लाभ घ्यावा आपल्या हातुन शिवतिर्थावरी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पुजन होण्यासाठी शिवभक्त प्रतिष्ठानशी संपर्क करावा .तसेच पंढरपूराती सर्व.समावेशक संघटना, युवामंच प्रतिष्ठान, मंडळे यांच्या सर्व पदाधिकार्‍यानी सुध्दा या प्रवाहाच्या माध्यमातून नित्य पुजा संकल्प अभियानाचा लाभ घ्यावा .आसे अवाहन शिवभक्त प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री.गजाननराव भोसले पंढरपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 








 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 21  फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 56 हजार 473  च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 225 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Post a Comment

0 Comments