विक्राळी रेल्वेपुलाचे काम लवकर पूर्ण करावे -मुख्यमंत्री

पंढरपूर लाईव्ह:-

दि. 7 फेब्रुवारी, 2015

 मुंबई, दि. 7 : विक्रोळी येथील त्याचप्रमाणे रेल्वेच्या अधिपत्याखालील रेल्वे पुलांची  कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत तसेच प्रवाशांच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात, असे  मध्य रेल्वेचे व्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथिगृह   विक्रोळी व विद्याविहार येथे रेल्वे पूल नसल्यामुळे स्थानिक नागरिक तसेच रेल्वे प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.  याचा रेल्वेने गांभीर्याने विचार करुन रेल्वे पुलाची समस्या सोडवावी, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


 सेंट्रेल रेल्वेचे व्यवस्थापक श्री. सूद यांनी सांगितले की, या रेल्वेपूलाचे काम पुढील महिन्यात सुरु करण्यात येईल. तसेच विद्याविहार येथील रेल्वेपूलाला काही तांत्रिक बाबींमुळे अद्याप परवानगी मिळाली नसल्याने पुलाचे काम झाले नाही. लवकरात लवकर या रेल्वे पुलाची परवानगी घेण्याचे काम पूर्ण करण्यात येईल.

 यावेळी एम.एम.आर.डी.ए.चे आयुक्त यू.पी.एस. मदान, मुंबई मेट्रोचे अतिरिक्त आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास तसेच सेंट्रल रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111  ई-मेल:-  jhanjavat@gmail.com    

livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 8 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 51 हजार 739 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 714 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.


Post a Comment

0 Comments