के.बी.पी. चौकात भीषण अपघात... दोघांचा करुण अंत... प्रवाशांसाठी ‘खतरनाक’ बनलाय हा चौक....

पंढरपूर लाईव्ह (दि.21 फेब्रुवारी 2015):- 

आज सायंकाळच्या वेळेस पंढरपूर शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील चौक (के.बी.पी. कॉलेज चौक) येथे पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या टँकरने समोरुन येणार्‍या दुचाकी ला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील दोघांचाही करुण अंत झाला आहे.  याच चौकात वेगवेगळ्या अपघातामध्ये अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. आजही दोघा निष्पाप जीवांचा बळी येथे गेला आहे.

या अपघाताबाबत पोलिसांकडून समजलेले वृत्त असे की, आज दि. 21 फेब्रुवारी 2015 रोजी दुपारी 4 वाजणेच्या सुमारास   भरधाव वेगाने अकलूजकडून पंढरपूरकडे येत असलेल्या टँकर ने के.बी.पी. चौकातील (क्रांतीसिंह नाना पाटील चौक) पोलिस चौकीनजीकच्या बायपास रोडलगत पुढे असलेल्या (मोटार सायकल क्रमांक एम.

याबाबत फिर्यादी वसंत नरसिंह जोशी, रा. भाजी मार्केट, पंढरपूर यांनी आरोपी टँकर चालक (टँकर क्रमांक एम.एच. 04/इ.बी. 6010) याविरुध्द पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात टँकर चालकाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यातील टँकर चालक फरार असून याचा तपास चालु आहे. पुढील
तपास पोलिस उपनिरीक्षक एम. बी. माने हे करत आहेत.
एच. 12 इ. पी. 9487) या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली व  फरफटत नेले. यामुळे जबर जखमी झालेलेे मोटारसायकलवरील श्रीकांत रामदास पाठक (41) रा. पुजारी सिटी, पंढरपूर हे जागीच मृत्युमुखी पडले तर दुचाकीवरील दुसरे जखमी झालेले नागेश बब्रुवान शेटे (35) हे येथील विठ्ठल हॉस्पिटल येथे उपचाराकरिता नेले असता उपचारादरम्यान ते ही मृत्युमुखी पडले.

काळजाचा थरकाप उडवणारा अपघात...!

हा अपघात एवढा भयानक होता की,  पहाताच जीवाचा थरकाप उडावा... घटना स्थळावरील दृश्य मन हेलावून टाकणारे होते.... टँकरखाली संपुर्ण दुचाकी गेलेली होती... चौक रक्तरंजीत झालेला होता... बघ्यांमधून अपघातात मृत्यू झालेल्यांबद्दल हळहळ व्यक्त होत होती...

 गेल्याच महिन्यात दि. 8 जानेवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ ने ‘के.बी.पी. चौक प्रवाशांसाठी खतरनाक’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिध्द केले होते. त्या दिवशी एका ग्रामस्थाचा जीव बालंबाल बचावला होता. याची पुनरावृत्ती एखाद्या मोठ्या अपघाताने घडू शकते... इथे कायमस्वरुपी वाहतुक पोलिसांची नियुक्ती हवी... अशा आशयाच्या या वृत्ताची दखल जर पोलिसांनी घेतली असती तर आजचा अनर्थ नक्कीच टाळता आला. असता असे वाटते.


खास वाचकांच्या आग्रहास्तव दि. 8 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ने प्रकाशित केलेली ‘ती’ बातमी जशीच्या तशी पुढे पुन्हा प्रसिध्द करत आहोत...


पंढरपूर लाईव्ह

दि. 8 जानेवारी 2015

पंढरपूरमधील के.बी.पी. चौक प्रवासासाठी खतरनाक

  • आज घडलेल्या एका अपघातात बाईकस्वार बालंबाल वाचला...

  • अपघातांचे वाढते प्रमाण...

  • आकारमानाने हा चौक लहान...

  • वाहतुकीची कोंडी ही नेहमीची बाब...

  • या चौकातून होते मोठी रहदारी....

  • भरधाव वेगाने येणार्‍या अवजड वाहनांचा राबता याच चौकातून....

  • चौकातील चबुतरा असून अडचण नसून खोळंबा...

  • कायमस्वरुपी ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती हवी...

या चौकानजीक असणार्‍या के.बी.पी. पाटील कॉलेज समोर गतीरोधक बसवले होते. मात्र हे गतीरोधक गायब झालेले आहेत. त्यामुळे भरधाव वेगात धावणार्‍या वाहनांना इथे ‘ब्रेक’ लागत नाही... ब्रेक बसतोय तो सर्वसामान्यांच्या काळजाला... कधी कुठून कोणते वाहन येवून आपणास धडकेल या भीतीने या चौकातून महिला व वयोवृध्द नागरीक तसेच विद्यार्थी जीव मुठीत धरुन प्रवास करत असतात.

 पंढरपूर-पुणे मार्गावरील पंढरपूर शहरातील सर्वात महत्वाचा चौक म्हणजे क्रांतीसिंह नाना पाटील चौक (के.बी.पी.चौक) हा असून या  चौकामध्ये विविध अपघातांमध्ये अनेकांचे बळी गेलेले आहेत. येथील अपघातांचे वाढते प्रमाण पहाता सर्वसामान्यांना प्रवासासाठीचा हा चौक सर्वात ‘खतरनाक’ बनलेला आहे. या चौकात पोलीस चौकी आहे मात्र येथे दिवसभर रिकामटेकड्यांचाच ठिय्या असतो. याठिकाणी कायमस्वरुपी वाहतुक पोलिसांची नेमणूक करणे आवश्यक आहे मात्र याकडे वारंवार का दुर्लक्ष केले जाते? या प्रश्‍नाचे उत्तर मिळत नाही.


या चौकातून नविन पुलाकडे जाण्यासाठी बायपास रस्ता आहे मात्र अनेक ट्रक व टिपर चालक या बायपास रस्त्यावरुन न जाता पंढरपूर शहरातून भरधाव वेगात जातात. यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होते. क्रांतीसिंह नाना  लहान मोठे अपघात होणे येथे नविन नाही. पुण्याच्या दिशेकडून येणारी... कोल्हापूर सातार्‍याकडून येणारी अवजड वाहतुक येथूनच भरधाव वेगात होते. जवळच कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, यशवंत विद्यालय, इंग्लिश मिडीयम स्कुल, राजाराम इंग्लिश मिडीयम स्कुल, कवठेकर प्रशाला आदी शैक्षणीक संस्था आहेत. त्यामुळे या चौकातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग प्रवास करत असतात. म्हणूनच या चौकातील वाहतुकीला शिस्त लावणे अत्यावश्यक आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत अनेक युवक भरधाव वेगात बाईक्स् पळवताना सर्रास आढळतात... त्यातल्या त्यात शैक्षणिक संस्थांकडे जाणार्‍या रस्त्यावरील प्रवास म्हणजे सर्वसामान्यांसाठी ‘जीव मुठीत धरुन’ केल्यासारखाच आहे. याला आळा बसण्यासाठी पंढरपूर शहर वाहतुक शाखेच्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष देवून योग्य त्या उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

 ************************

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 21  फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 56 हजार 858  च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 261 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 









Post a Comment

0 Comments