दि. 21 फेब्रुवारी 2015
पंढरपूर लाईव्ह (गोपीनाथ देशमुख यांजकडून)
वीजेच्या तारांमधून पडलेल्या ठिणग्यामुळे करकंबमधील एका शेतकर्याच्या ऊसाला भीषण आग लागल्याची दुर्देवी घटना आज घडली असून ऊसासह ठिबक सिंचन संच जळून खाक झाल्यामुळे संबंधीत शेतकर्याचे अतोनात नुकसान झालेले आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, आज दुपारी 2:30 वाजणेच्या सुमारास करकंब (ता.पंढरपूर) येथील देेशमुख वस्ती परिसरातील शंकर सुखदेव देशमुख यांच्या ऊसाला वीजेच्या तारांमधून पडलेल्या ठिणग्यामुळे भीषण आग लागली. यावेळी ऊसाबरोबरच ऊसाला पाणी देण्यासाठी बसविण्यात आलेल्या (ड्रीप) ठिबक संचाचेही जळून नुकसान झालेले आहे. जळालेला ऊस एकुण दोन एकर असून या सर्व ऊसाला पाणी देण्यासाठीबसविलेल्या ठिबक संचाच्या पाईपलाईनसह सर्व संच जळालेला असल्याचे समजते.
आग विझविण्याचा प्रयत्न केला असता ऊन व वारा यामुळे बचावकार्यात अडथळा येत होता. कांही काळापुरवता या भागातील वीजपुरवठा ही खंडीत करण्यात आला होता.
या घटनेतील नुकसान पदरी पडलेले शेतकरी श्री. देशमुख यांच्याच शेतामध्ये महावितरण चा डी.पी. आहे मात्र या डीपीला जोडलेल्या वीजेच्या तारा या जमीनीपासून फारच कमी अंतरावर लोंबकळत असल्यामुळे पक्षी या तारेवर बसले तेंव्हा आणि वार्याच्या झोतामुळे या तारा एकमेकांना घर्षण होऊन यातून आगीच्या ठिकर्या पडत असत. यामुळेच ही दुर्दैवी घडलेली असल्याचे प्रत्यक्षर्शी ग्रामस्थांनी सांगितले. शेतकर्यामधून याबाबत नाराजीचा सुर उमटत असून महावितरण कंपनीच्या अधिकार्यांना आणि कर्मचार्यांना कधी जाग येणार? असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधीत शेतकर्याने महावितरण कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केल्याचेही समजते.
*********************************
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 21 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 56 हजार 501 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 226
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 21 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 56 हजार 501 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 226 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...


















0 Comments