पंढरपूर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार देशमुख यांच्यावरील हल्ल्याचा निषेध

 पत्रकार संरक्षण कायद्यासाठी प्रांताधिकार्‍यांना निवेदन

  पंढरपूर लाईव्ह:-

दि.9/2/1015 

परभणी जिल्ह्यातील जिंतुर तालुक्यातील बामणी येथील येथील पत्रकार राजु  देशमुख यंाना व त्यांच्या पत्नीसह कुटुंबावर परभणी येथील गावगुंडानी हल्ला चढवीत जबर मारहाण केली असुन आमच्या विरोधात बातमी लावतो काय ! अशी विचारणा करीत या गावगुंडाणी हल्ला केला आहे.या नृशंस हल्ल्याचा पंढरपूर पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला असुन सदर प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी प्रांताधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले आहे.   

            महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात पत्रकारांवर हल्ला करण्याचे प्रमाण वाढले असुन दहशतीच्या जोरावर गावगुंड आता पत्रकारांनाही आपले टार्गेट करत आहेत.पत्रकारांना सरक्षण द्यावे यासाठी कायदा करावा या मागणीकडे  शासनाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.तरी पत्रकार संरक्षण कायदा त्वरीत आमलात आणावा अशीही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
         हे निवेदन देताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्नीत पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे,कार्याध्यक्ष संतोष कुलकर्णी,उपाद्यक्ष राजभाऊ शहापूरकर,शरद कारटकर,सचिव विकास पवार,प्रसिध्दी प्रमुख नितिन शिंदे,शंकर कदम,कोषाध्यक्ष दिनेश खंडेलवाल,दत्ता पाटील,विक्रम कदम,राजु मिसाळ,संजय यादव यांच्यासह पंढरपूर पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

 

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 9 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 52 हजार 035 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 3 हजार 744 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Post a Comment

0 Comments