फार्सच्या बादशहाला अखेरचा सलाम !

फार्सच्या बादशहाला अखेरचा सलाम !

पंढरपूर लाईव्ह:-

एका बाजूला बेळगावात नाट्य संमेलन साजरे होत असताना मराठी रंगभूमीवर फार्सचा बादशहा म्हणून ओळखल्या गेलेल्या आत्माराम भेंडे यांची जगातून एक्झिट व्हावी हा दुर्दैवी योगायोग. . " झोपी गेलेला जागा झाला ", " दिनूच्या सासूबाई राधाबाई " " घोळत घोळ " अश्या अफलातून फार्सचे लेखक आणि विनोदी अभिनेते बबन प्रभू यांच्या सर्वच फार्स मधून आत्माराम भेंडे यांनी भूमिका केलेल्या होत्या . " दिनूच्या सासूबाई राधाबाई " या फार्स मधील डॉ .नाय हि भन्नाट व्यक्तिरेखा आत्माराम भेंडे यांनी अजरामर केली .
विट्याला मी कॉलेजला शिकत असताना आमच्या ग्यादरिंगसाठी बबन प्रभूंचे " दिनूच्या सासूबाई राधाबाई " हे नाटक ( फार्स ) बसवण्याचे ठरले तेंव्हा यातल्या डॉ . नाय या भूमिकेसाठी माझी निवड केल्यानंतर आमचे दिग्दर्शक आणि इंग्रजीचे प्राध्यापक श्री कोकीळ सर मला म्हणाले , " हि भूमिका आत्माराम भेंडेंनी अजरामर करून ठेवली आहे . मला विश्वास आहे तू या भूमिकेची शान टिकवून ठेवशील " मी माझ्या परीने प्रयत्न केला आणि त्या वर्षीचा अभिनयाचा प्रथम पुरस्कार मला या भूमिकेसाठी मिळाला .
आत्माराम भेंडे ना मी सर्वात प्रथम " दीड शहाणे " या धमाल विनोदी चित्रपटात प्रथम पहिले . ( या चित्रपटाबद्दल मी काही दिवसांपूर्वी लिहिले होते ), अशोक सराफ , राजा गोसावी , निळू फुले असे मातब्बर असून सुद्धा आत्माराम भेंडे यांनी साकारलेले रामदासपुरचे संस्थानिक महाराज समशेर बहाद्दर तेंव्हा खूप गाजले होते . तोंडात पाईप धरून सतत " गुड गुड गुड गुड " म्हणण्याची त्याची लकब तेंव्हा खूप प्रसिद्ध झाली होती . ( यु टूब वर हा चित्रपट उपलब्ध आहे ) . त्यानंतर आत्माराम भेंडे दिसले ते लक्ष्मीकांत बेर्डे च्या " आम्ही दोघे राजा राणी " मधेच ..
एका महान कलावंताने आज कायमची एक्झिट घेतली . फार्सच्या या बादशाहाला त्रिवार सलाम 

......श्याम सावजी ....पंढरपूर...

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. 

आज दि. 8 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 51 हजार 739 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 3714 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.  

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

 मोबा. नं.  8055434499  /  8308838111

 ई-मेल:-  jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com

Post a Comment

0 Comments