पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर दि.19 - पंढरपूर शहरातील नागरिकांच्या अडी-अडचणी जाणुन घेण्यासाठी व मतदारांचे आभार मानण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी पंढरपूर शहरामध्ये बुधवार दि.18.02.2015 पासून प्रभाग भेट दौरा सुरू केला. बुधवार दि.18.02.2015 रोजी सायं.05.30 वाजता आय.एम.ए.हॉल, नागालॅण्ड मागे, लिंकरोड, पंढरपूर येथे प्रभाग क्र.8 चा प्रभाग भेट पार पडली. सदरवेळी स्थानिक नागरिकांच्या अडी-अडचणी, तक्रारी, सूचना आमदार श्री भालके यांनी ऐकून घेऊन त्यांची निवेदने स्विकारली. सदरवेळी आमदार श्री भारत भालके म्हणाले की, पंढरपूर शहरातील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन तसेच चंद्रभागा नदीच्या पात्राची स्वच्छता या संदर्भात मार्च महिन्यातील विधानसभेच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून सदर कामासाठी भरघोस निधी आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ.श्री द.ता.भोसले सर, श्री विठ्ठल सुतगिरणीचे चेअरमन श्री दिनकरबापू पाटील, श्री विठ्ठल साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री लक्ष्मणआबा पवार, संचालक श्री युवराजदादा पाटील, नगरसेवक सर्वश्री संजय घोडके, राहुल साबळे, प्रकाश परदेशी, शंकरकाका पवार, तसेच सर्वश्री संजय भिंगे, महादेव भालेराव व महिला यांचेसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.तसेच सदर दिवशी सायं.07.00 वाजता प्रभाग क्र.1 मधील मारूती मंदिर, मलपे चौक, इसबावी-पंढरपूर येथील नागरिकांच्या अडी-अडचणी, तक्रारी, सूचना आमदार श्री भालके यांनी ऐकून घेऊन त्यांची निवेदने स्विकारली.
सदरवेळी आमदार श्री भारत भालके म्हणाले की, महिलांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग-धंदे उभारण्याचा मानस आहे. या परिसरातील ङ्गुटलेले ड्रेनेज आणि सांडपाण्याच्या प्रश्नासंदर्भात संबंधित अधिकार्यांना कामे पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या.
यावेळी श्री विठ्ठल सुतगिरणीचे चेअरमन श्री दिनकरबापू पाटील, नगरसेवक श्री संजय घोडके व सर्वश्री संजय भिंगे, शेखर भोसले, सतीश शिंदे, प्रशांत शिंदे, शिंदे सर आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित होते.
सदर दोन्ही बैठकीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडी-अडचणी, तक्रारी, सूचनांची निवेदने आमदार श्री भारत भालके यांना दिल्या.
........................................................................
आमदार श्री भारत भालके यांचा पंढरपूर शहरातील प्रभाग दौरा
पंढरपूर ः दि.21 - पंढरपूर शहरातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेणेसाठी तसेच मतदारांचे आभार मानण्यासाठी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी आज शुक्रवार दि.20.02.2015 रोजी शहरातील न्यु अकबर टॉकीज जवळ, गांधीरोड, पंढरपूर येथे प्रभाग क्र.4 मधील गांधीरोड, उत्पात गल्ली, पश्चिमद्वार, घोंगडेगल्ली, हरिदास वेस, चौङ्गाळा, महाद्वार या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणुन घेतल्या.
प्रभाग क्र.4 मधील नागरिकांनी आपल्या विविध समस्या निवेदनाद्वारे आमदार श्री भालके यांना दिल्या. यावेळी नागरिकांनी जनाधार योजनेतील अडचणी, सार्वजनिक स्वच्छता गृहे, ड्रेनेज, कचर्याच्या समस्या, घंटा गाडी समस्या इत्यादी तक्रारी दिल्या.
सदरवेळी आमदार श्री भारत भालके म्हणाले की, महिलांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग-धंदे उभारण्याचा मानस आहे. या परिसरातील ड्रेनेज आणि सांडपाण्याच्या प्रश्नासंदर्भात संबंधित अधिकार्यांना कामे पूर्ण करण्यासाठी सूचना दिल्या. पंढरपूर शहरातील पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन तसेच चंद्रभागा नदीच्या पात्राची स्वच्छता या संदर्भात येत्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी प्रश्न उपस्थित करून सदर कामासाठी भरघोस निधी आणण्याचा प्रयत्न करणार आहे.
यावेळी नगरसेवक सर्वश्री संजय घोडके, दिपकदादा वाडदेकर, तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष श्री सुधीर धुमाळ व सर्वश्री बजरंग थिटे, राजेंद्र भोसले, डी.राज सर्वगोड, सुभाष हुंगे-पाटील, बाळासाहेब होरणे, लाला पेंटर, इम्रान मणेरी, चिंतामणी उत्पात, संतोष बंडगर, सुधीर थिटे, जालिंधर सगर, सुधीर घोडके, आदींसह परिसरातील ज्येष्ठ नागरिक व कार्यकर्ते-पदाधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या अडी-अडचणी, तक्रारी, सूचनांची निवेदने आमदार श्री भारत भालके यांना दिल्या.

*********************************
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 21 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 56 हजार 473 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 225
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 21 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 56 हजार 473 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 225 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

.jpg)

0 Comments