श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट मध्ये 385वी शिव जयंती साजरी
पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर - ‘आतापर्यंतच्या शिवचरित्रात शिवरायांचा ‘ दक्षिण दिग्वीजय’ व त्यांनी ‘निर्माण केलेले आरमार’ या दोन प्रमुख बाबीत कमी संशोधन झाले असून शिवाजी महाराजांची रणनिती आखतानाची सावधगिरी नजरेआड करुन चालणार नाही. शत्रुंना प्रवेश करण्यास अवघड जार्इल या हेतूने त्यांनी दुर्गम किल्ले बनविले. त्यांच्या अनेक किल्यांचे परीक्षण केल्यास किल्ला तयार करणार्या स्थापत्य अभियांत्रिकीचे कमालीचे कौशल्य दिसून येते.’ असे प्रतिपादन संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यीक डॉ. आ. ह.साळुंखे यांनी केले.
येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित इंजिनिअरिंग कॉलेजच्या मध्यवर्ती अॅम्पी थिएटरमध्ये आयोजिलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 385व्या जयंती निमित्त प्रमुख पाहूणे म्हणून जेष्ठ साहित्यिक डॉ. साळुंखे उपस्थितांसमोर शिवचरित्र उलगडत होते. दिपप्रज्वलनानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराजांच्या चरित्रातून सामर्थ्याबरोबरच शील आणि विवेक घेवू या.’ हा संदेश दिला. संकल्प मस्के, अक्षय मोरे, निलेश खरमुसे, विजय खंडागळे, श्ाुभांगी लोखंडे, निलकंठ काकडे, चिन्मय पाठक, प्रज्ञा राऊत, अमोल घोडके, ओंकार देशपांडे यांनी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न
विठ्ठल रुक्मीणी मंदीर समितीचे विश्वस्त जयंत भंडारे, अॅड. राहूल घ्ाुले, बंटी वाघ, महेश पवार, अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त प्रा. सी.बी. नाडगौडा, सौ.नाडगौडा, विश्वस्त दादासाहेब रोंगे, विश्वस्त एच.एम. बागल, विश्वस्त बी.डी.रोंगे, पालक संघाचे आबासाहेब दैठनकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. ए.जी.कोरके, प्रा.यशपाल खेडकर अभियांत्रिकी व फार्मसीच्या पदवी पदविकांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.स्ाुत्रसंचालन निरंजन जोशी, आश्ाुतोष कटारे, प्रथमेश चौधरी व अभिषेक पाटील यांनी केले तर विद्यापीठ विद्यार्थी प्रतिनिधी साहिल भगत यांनी आभार मानले.
छायाचित्र - 1.येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट मध्ये शिवजयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी बोलताना प्रमुख पाहूणे संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक, ज्येष्ठ विचारवंत, साहित्यीक डॉ. आ. ह.साळुंखे सोबत डावीकडून ज्येष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे, विठ्ठल रुक्मीणी मंदीर समितीचे विश्वस्त जयंत भंडारे, अॅड. राहूल घ्ाुले, संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल, व आदि. 2.प्रमुख पाहूणे ज्येष्ठ विचारवंत, साहित्यीक डॉ. आ. ह.साळुंखे यांचे स्वागत व सत्कार करताना अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल सोबत डावीकडून सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे, ज्येष्ठ विश्वस्त दादासाहेब रोंगे व आदि. 3.प्रमुख पाहूणे ज्येष्ठ विचारवंत, साहित्यीक डॉ. आ. ह.साळुंखे यांच्या हस्ते डिप्लोमा पॉलीटेक्नीकच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात आले.
*********************************
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 21 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 56 हजार 473 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 225
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 21 फेब्रुवारी 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 56 हजार 473 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 4 हजार 225 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...




















0 Comments