पंतप्रधान मोदींनी संससदेतील कँटीनमध्ये जेवणाचे बील भरले..! कँटीनच्या व्हिजिटर्स बुकमध्ये दिला अभिप्राय अन्नदाता सुखी भव..!’’

पंढरपूर लाईव्ह

सोमवार दि.2 मार्च 2015

आपल्या देशाचे पंतप्रधान संसदेच्या कँटिनमध्ये स्वखर्चानं जेवल्याचं बहुधा कुणाच्याच ऐकिवात नसेल... पण, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ’लंच टाइम’मध्ये थेट संसदेचं कँटिन गाठलं, व्हेज थाळी मागवली, तिचा आस्वाद घेतला आणि स्वतःच्या खिशातून 29 रुपये काढून देत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कँटिनच्या व्हिजिटर्स बुकमध्ये ’अन्नदाता सुखी भव’ असा अभिप्रायही मोदींनी आवर्जून लिहिला.


सरकारी कार्यालयांना अचानक भेट देऊन तपासणी करायची नरेंद्र मोदींची सवय आता सगळ्याच अधिकार्‍यांना ठाऊक आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासूनच अनेक अधिकारी-कर्मचार्‍यांना त्यांनी ’सरप्राइज व्हिजिट’ने धक्का दिलाय. या सवयीनुसारच, आज दुपारी ते गुजरातच्या दोन खासदारांसोबत संसदेतील कँटिनमध्ये धडकले. त्यांना पाहून कँटिन कर्मचार्‍यांचं धाबं दणाणलं. व्यवस्थापकांची तर तारांबळच उडाली. पण, ते तपासणीसाठी आले नसून जेवायला आलेत हे कळल्यावर सगळ्यांनीच सुटकेचा निःश्वास सोडला.

साधा-सात्विक आहार घेणार्‍या नरेंद्र मोदींनी व्हेज थाळी मागवली. त्यात साग, कोशिंबीर, डाळ, चपाती आणि भाजी होती. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर मोदींनी बिलाचे 29 रुपये स्वतःच्या खिशातून काढून दिले, तेव्हा कँटिनचे कर्मचारी आणि इतर उपस्थित मंडळीही चकितच झाली. अलीकडच्या काळात कुठलेच पंतप्रधान संसदेच्या कँटिनमध्ये जाऊन जेवल्याचं आपण ऐकलेलं नाही. त्यामुळेच मोदींची ही कँटिनभेट आगळी ठरली.

बराक ओबामा-  ’आम आदमी’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांही अनेक वेळा ’व्हाइट हाऊस’बाहेरील फूड जॉइण्टवर अचानक भेट देऊन जंक फूडचा आस्वाद घेतात. ओबामा रांगेत उभे राहून ऑर्डर देतात आणि ऑर्डर येईपर्यंत हॉटेलमधील इतर ग्राहकांबरोबर गप्पा मारतात, फोटो काढतात तसेच हॉटेलमध्ये मिळणा-या पदार्थांच्या चवीबद्दलही चर्चा करतात. त्यांच्याकडूनच मोदींना कँटिनभेटीची कल्पना सुचलेली असू शकते. 

*****

 


आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8055434499  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com   livepandharpur@gmail.com

  आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 2मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   67 हजार 752 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 710 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...






 









 

 

 




Post a Comment

0 Comments