पंढरपूर लाईव्ह
सोमवार दि.2 मार्च 2015
‘आदर्श’ च्या बहुचर्चित घोटाळ्यात नाव आल्यानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद गमावलेल्या आणि ‘पेड न्यूज’ प्रकरणामुळेही अडचणीत आलेले काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या खांद्यावर काँग्रेसश्रेष्ठींनी आज प्रदेशाध्यक्षपदाचा झेंडा दिला आहे. त्यासोबतच, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा माजी खासदार संजय निरुपम यांच्या खांद्यावर सोपवण्याचा निर्णय झाला आहे. महाराष्ट्रात नामशेष होण्याच्या मार्गावर असणार्या काँग्रेस (आय) ला नवी उभारी देण्याचं फार मोठी जबाबदारी या दोघांच्या खांद्यावर पडलेली आहे.
माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांकडून मिळालेला राजकीय वारसा, उच्च शिक्षण, मुरब्बीपणा, आक्रमकता आणि नेतृत्वगुणांच्या जोरावर अशोक चव्हाण यांनी मराठवाड्यात काँग्रेस संघटना बांधली आहे. त्याचमुळे मोदी लाटेतही ते जिंकू शकले होते. असंच काम करणारा नेता, खिळखिळ्या होत जाणार्या काँग्रेसला आजघडीला हवा होता. त्यामुळेच माणिकराव ठाकरेंकडची प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अशोकरावांकडे सोपवली जाण्याची चर्चा सुरू होती. अखेर आज काँग्रेसश्रेष्ठींनी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. आता ’मित्रपक्ष’ राष्ट्रवादीला टक्कर देऊन भाजप-शिवसेनेच्या वाढत्या वर्चस्वाला आवर घालण्यासाठी ते काय रणनीती आखतात, याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
मुंबईचं नेतृत्व निरुपमांकडे
मुंबईत मराठी मतांसाठी शिवसेना आणि मनसे यांची मारामारी सुरू असल्यानं, उत्तर भारतीयांच्या, परप्रांतीयांच्या एक गठ्ठा मतांसाठी काँग्रेसनं आत्तापासून मोर्चेबांधणी सुरू केल्याचे स्पष्ट संकेत या संघटनात्मक फेरबदलातून मिळालेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून जनार्दन चांदुरकर यांना हटवून, उत्तर भारतीय समाजाचा चेहरा असलेले आक्रमक नेते संजय निरूपम यांच्याकडे त्यांनी मुंबईचं नेतृत्व सोपवलं आहे. आता ते ही जबाबदारी कशी पार पाडतात, हे महापालिका निवडणुकीतच स्पष्ट होईल.
*****
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. दि. 2मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 67 हजार 752 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 710
च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत
असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात
अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
मोबा. नं. 8055434499 / 8308838111
ई-मेल:- jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. दि. 2मार्च 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या 67 हजार 752 च्या घरात पोहचलेली आहे. तर अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या 5 हजार 710 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पंढरपूर लाईव्ह च्या माध्यमातून शिवभक्तांनी शिवजन्मोत्सवानिमित्त दिलेल्या शिव शुभेच्छा...

















0 Comments