पंढरपूर लाईव्ह
पंढरपूर 9 :- पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित पंचरत्न इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये महिला दिनाचे औचित्य साधून खास महिलांसाठी पाककला व रांगोळी स्पर्धा घेण्यात आली.
पाककलेमध्ये तांदुळ व डाळी पासून पदार्थ बनवणे यामध्ये अनेक महिलांनी हिरीरीने भाग घेऊन अतिशय चविष्ट व पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते. पदार्थांची विविधता हेच या स्पर्धेचे वैशिष्ट्य ठरले. तसेच रांगोळी स्पर्धेमध्ये फ्री हॅण्ड व सामाजिक बांधिलकीचे भान ठेवुन ‘मला जगू द्या‘, ‘इश इीर्रींश‘ असा संदेश देणार्या रांगोळ्यांचाही समावेश होता. या कार्यक्रमासाठी पंचरत्न स्कुलच्या मुख्यध्यापिका सौ.सुनिता मोहोळकर यांचे मार्गदर्शन लाभले.
पाककलेमध्ये प्रथम क्रमांक-सौ.देवकी वासुदेव बडवे(मिक्स व्हेज राईस), द्बितीय क्रमांक-सौ.सोनाली दंदाडे(मूग बटाटा भजी), तृतीय क्रमांक-सौ.शितल संजय उंडाळे(दाळ-तांदूळ कोफ्ता), सौ.सुनिता श्रीरंग पाटील(मूग राईस थंडाई) अशा प्रकारचे पाक कृतीमध्ये वरील स्पर्धकांनी मान मिळविला. रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक-सौ.स्वाती पवार, व्दितीय क्रमांक-सौ.माधुरी कुरे तसेच उत्तेजनार्थ बक्षीस सौ.रोहिणी काळे, सौ.अर्चना गायकवाड, सौ.रेवती बडवे, माधुरी कुरे, सुनिता करे यांना मिळाले.
या स्पर्धेच्या परिक्षक म्हणून सौ.शांभवी दुधगीकर, सौ.मृदुला उंबरकर, कलाशिक्षीका सौ.विष्णुप्रिया वाडेकर होत्या. तसेच सौ.कुलकर्णी, सौ.धांडोरे, सौ.सुर्यगण तसेच सर्व शिक्षीकांनी स्पर्धा यशस्वी होणेसाठी परिश्रम घेतले.



.jpg)

0 Comments