श्रीविठ्ठल कारखान्यावर कर्मवीर औदुंबरआण्णांची 15 वी पुण्यतिथी साजरी

श्रीविठ्ठल कारखान्यावर कर्मवीर औदुंबरआण्णांची 15 वी पुण्यतिथी साजरी

पंढरपूर लाईव्ह (दि.28) पंढरपूर तालुक्यातील वेणुनगर-गुरसाळे येथील श्रीविठ्ठल साखर कारखाना येथे संस्थापक-चेअरमन व माजी आमदार कर्मवीर कै.औदुंबरआण्णा पाटील यांची 15 वी पुण्यतिथी रविवार दि. 28 जून 2015 रोजी सकाळी 10 वा. साजरी करण्यात आली.


याप्रसंगी कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर कै.औदुंबरआण्णा पाटील यांचे पुर्णाकृती पतळ्याची विधीपुर्वक पुजा कारखान्याचे चेअरमन मा.आमदार श्री.भारत तुकाराम भालके यांच्या शुभहस्ते व व्हा.चेअरमन श्री.लक्ष्मणआबा पवार व माजी व्हाईस चेअरमन व संचालक श्री.मोहनआण्णा कोळेकर, संचालक श्री.राजूबापु पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. याप्रसंगी संचालक सर्वश्री. विठ्ठल मोरे, दशरथ खळगे, रामदास चव्हाण, गंगाधर गायकवाड, विभिषण पवार, धोंडीबा वाघमारे, विजयसिंह देशमुख, कांतीलाल भिंगारे, जयसिंह देशमुख, माधव चव्हाण, नेताजी सावंत, प्रशांत देशमुख, दिलीप पुरवत, सदाबसे, शालिवाहन कोळेकर, कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक एम.सी.आतकरे, सेक्रेटरी श्री.सी. कर्वे, वर्क्स मॅनेजर आर.व्ही.लुगडे, कारखान्याचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी वर्ग, कार्यकर्ते, सभासद व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्व संचालक व मान्यवरांनी कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील यांना आदरांजली वाहिली.   

*******************

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com



Post a Comment

0 Comments