जिद्द आणि चिकाटीनेच उच्च पदावर विराजमान होता येते - आमदार भारत भालकेपंढरपूर ः दि.26 - शुक्रवार दि.26.06.2015 रोजी रखुमाई सभागृह, पोलीस संकुल, पंढरपूर येथे लोकराजा राजर्षी शाहू प्रतिष्ठान, पंढरपूर-मंगळवेढा यांचे वतीने राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून पंढरपूर तालुक्यातील इयत्ता 10 वी व 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ संपन्न झाला. सदर प्रसंगी जिद्द आणि चिकाटीनेच उच्च पदावर विराजमान होता येते असे उद्गार पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार मा.श्री भारत भालके यांनी काढले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे आमदार मा.श्री भारत भालके, प्रमुख पाहूणे म्हणून पुणे विभागाचे शिक्षक आमदार मा.श्री दत्तात्रय सावंत सर, सह.शि.वसंतराव काळे सह. सा. कारखान्याचे चेअरमन मा.श्री कल्याणराव काळे तसेच प्रमुख वक्ते व लोककवी,संगीतकार,सिने पार्श्वगायक मा.श्री प्रशांत मोरे होते. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलाने व राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमा पुजनाने झाली. कार्यक्रमाचे संयोजक मा.श्री भगिरथ भालके यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलतांना श्री भगिरथ भालके म्हणाले की, परीश्रमाने गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी व त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी. तसेच भविष्यात उच्चशिक्षण घेत असतांना विद्यार्थ्यांना येणार्या अडचणी सोडविण्यासाठी हे प्रतिष्ठान तन-मन-धनाने सदैव त्यांचे पाठीशी राहिल असे आश्वासन दिले.
पुढे बोलतांना आमदार भारत भालके म्हणाले की, राजर्षी शाहू महाराजांनी एकसंघ भारताचे स्वप्न पाहिले होते. त्यासाठीच त्यांनी सर्व जाती-धर्मातील, तळागाळातील वंचित लोकांच्या मुलांना मुलभूत शिक्षणाच्या सुविधा निर्माण करून वसतीगृहांची स्थापना केली. शिक्षण घेऊन आलेल्यांना संस्थानामध्ये नोकरीत 50 टक्के आरक्षणाची तरतूद करणारा या देशातील एकमेव राजा होता. म्हणूनच सर्व तरूण विद्यार्थी मित्रांनी सावित्रीबाई ङ्गुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा शिक्षणामागील अपेक्षित हेतू लक्षात घेऊन सुसंस्कृतित पिढी घडवून सामाजिक क्षमतेची जबाबदारी स्विकारण्याचे त्यांनी आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे शिक्षक आमदार मा.श्री दत्तात्रय सावंत सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, परिक्षेतील गुणदानांबरोबरच गुणवंत होण्याचे व परिश्रमाने उत्तुंग यश मिळतेच असे सांगितले. कार्यक्रमाचे पाहुणे मा.श्री कल्याणराव काळे आपल्या मनोगतामध्ये म्हणाले की, इयत्ता 10 वी व 12 वी हे वर्ष आयुष्याला, भविष्याला गती आणि दिशा देणारे असल्यामुळे विद्यार्थ्यांनी सदैव जागृत असले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते लोककवी, संगीतकार, सिने पार्श्वगायक मा.श्री प्रशांत मोरे यांनी मुलांच्या भविष्यासाठी चिंतातूर बापाची मनाची अवस्था आपल्या काव्यातून स्पष्ट केली. किर्तीवंत व यशवंत होत असतांना विद्यार्थ्यांनी भविष्यात घराच्या उंबर्याला व नात्या-गोत्याला न विसरण्याचे आवाहन श्री मोरे यांनी केले.
या कार्यक्रमास श्री विठ्ठल साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन मा.श्री लक्ष्मणआबा पवार, श्री विठ्ठल सुत गिरणीचे चेअरमन मा.श्री दिनकरबापू पाटील, के.बी.पी. कॉलेजचे प्राचार्य डॉ.जे.जी.जाधव, श्री विठ्ठल कारखान्याचे संचालक सर्वश्री मोहनअण्णा कोळेकर, राजुबापू पाटील, दशरथ खळगे, रायाप्पा हळणवर, युवराजदादा पाटील तसेच पंढरपूर पंचायत समितीचे मा.उपसभापती श्री विजयसिंह देशमुख, तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष श्री सुधीर धुमाळ, पंढरपूर नगरपरिषदेच्या आरोग्य सभापती सौ.मनिषाताई कोताळकर, मा.उपनगराध्यक्ष श्री संजय घोडके, यशवंत पतसंस्थेचे चेअरमन श्री नारायण मोरे, प्रतिभादेवी पतसंस्थेचे चेअरमन श्री महादेव देठे, तसेच सर्वश्री दिलीप देवकुळे, सुधीर भोसले, संजय भिंगे, शिवाजी हुंगे-पाटील, सुभाष हुंगे-पाटील, शेखर भोसले, उध्दव साळुंखे, मुख्याध्यापक श्री लक्ष्मण मोरे इत्यादी मान्यवरांबरोबर बहुसंख्या पालक वर्ग व नागरीक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री विठ्ठल प्रशालेचे शिक्षक श्री व्ही.जी.नागटिळक व बी.डी.गोडसे सर यांनी केले तर प्राचार्य मा.श्री आर.डी.पवार सर यांच्या आभाराने सदर कार्यक्रमाची सांगता झाली.
******************





0 Comments