आमदार श्री भारत भालके यांचे हस्ते भाविकांना फलाआहाराचे वाटप

आमदार श्री भारत भालके यांचे हस्ते भाविकांना फलाआहाराचे वाटप
पंढरपूर ... दि.28 - महाराष्ट ्राची दक्षिण काशी आणि वारकर्‍यांचे माहेर पंढरीत अधिकमास, एकादशी निमित्त श्री विठ्ठल मंदिर पश्‍चिमद्वार येथे भाविकांना पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री.भारत भालके यांचे शुभहस्ते वाटप करण्यात आले.


भाविकांची सेवा हीच श्री विठ्ठल सेवा मानून कै.मथुराबाई डोळ प्रतिष्ठान तर्ङ्गे 15 दिवसाचे एकादशीला दर्शन रांगेत 4 ते 5 तास उभे राहून श्री विठ्ठलाचे दर्शन घेऊन आनंदी झालेल्या भाविकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी पश्‍चिमद्वार येथे फलाआहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री विठ्ठल साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री लक्ष्मणआबा पवार, ज्येष्ठ संचालक सर्वश्री मोहनअण्णा कोळेकर, गंगाधर गायकवाड, दिपकराव सदाबसे, दशरथ खळगे, धोंडिबा वाघमारे, प्रशात देशमुख, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्री विजयसिंह देशमुख, तसेच सर्वश्री शालिवाहन कोळेकर, मामा ङ्गलटणकर, पत्रकार सुनिल उंबरे, शहर उपाध्यक्ष अमर सुर्यवंशी व समीर कोळी, मारूती भोसले सर, बाळासोा आसबे, संतोष डोळ, कंदले गुरूजी, चंद्रकांत डोळ, मनोज गावटे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांचे स्वागत व आभाराचे काम कै.मथुराबाई डोळ प्रतिष्ठानचे संस्थापक प्रा.अशोक डोळ यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मतिसागर, मल्हार, पांडुरंग डोळ यांनी परिश्रम घेतले.

******************

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com



Post a Comment

0 Comments