रुद्रप्रतापसिंह गणेश सिंघण च्या दुसर्‍या वाढदिवसानिमित्त कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचे शुभहस्ते वॉर्ड क्र. 22 मधील नागरिकांना101 फळझाडांचे वाटप

पंढरपूर लाईव्ह वृत्त:- 

येथील गणेश भक्त नागेश सिंघण यांचे नातु व सामाजिक कार्यकर्ते गणेश सिंघण यांचे सुपूत्र
चि. रुद्रप्रताप गणेश सिंघण याच्या दुसर्‍या वाढदिवसाचे औचित्य साधुन माजी आमदार कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते पंढरपूरच्या वॉर्ड क्र. 22 मधील नागरिकांना 101 फळझाडांचे वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांनी आपापल्या घराच्या अंगणात, परसबागेत विविध फळांच्या झाडांची लागवड करावी जेणेकरुन याद्वारे वृक्षसंवर्धन होईल.  हा यामागचा उदात्त हेतु आहे. पंढरपूरचे जेष्ठ नेते कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचा आदर्श जोपासत सिंघण कुटूंब नेहमीच विविध सामाजिक कार्यात सहभागी होत असते. आज आमच्या नातवाच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन ‘वृक्षसंवर्धन’ हा सामाजिक उपक्रम राबवत असल्याची माहिती खादी ग्रामोद्योगचे विद्यमान अध्यक्ष, गणेशभक्त  प्रा.नागेश सिंघण यांनी दिली. 

 यावेळी श्री.प्रभाकर (बाबा) परिचारक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन दाजी भुसनर, विवेक वर्धिणी प्राथमीक विद्यालयाच्या संचालिका सौ.आशाताई जमदाडे, प्रा.पांडुरंग जमदाडे, जेष्ठ नागरिक संघाचे आण्णासाहेब ऐतवाडकर, कोळी सर, श्री.लोटके व सर्व सदस्य  यांचे हस्ते ही फळझाडांचे वाटप करण्यात आले.


यावेळी श्री.खराडेसाो, प्रतापसिंह देवकर, श्रीकांत तोडकरी, कैलास स्वामी, अ‍ॅड.सतीश झिरपे, संतोष शेळके, सुहास मोरे, अनिल नलवडे, राजु क्षिरसागर, अमित काकडे, प्रशांत यावगल व मित्रपरिवार व परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. 
*********

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com



Post a Comment

0 Comments