झिम्बाब्वेसाठी मराठमोळ्या अजिंक्य राहणेकडे धुरा

मुंबई :  झिम्बाव्बे दौऱ्यासाठी टीम इंडियाची धुरा मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे देण्यात आली आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वन डे आणि २ टी-२० सामने खेळणार आहेत. सचिन तेंडुलकरनंतर पहिल्यांदा भारतीय संघाची धुरा एका मराठी माणसाच्या हाती आली आहे. सचिन तेंडुलकरने भारताची धुरा २००० पर्यंत सांभाळली होतीी. या दौऱ्यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, शिखर धवन, आर. अश्विन, रविंद्र जडेजा यांना विश्रांती देण्यात आली आहे. या दौऱ्यासाठी २०१२ नंतर हरभजन सिंग याला वन डेमध्ये संधी देण्यात आली आहे. 

झिम्बाब्वेसाठी संघ पुढील प्रमाणे - अजिंक्य रहाणे (कर्णधार ), मुरली विजय, रायडू, मनोज तिवारी, केदार जाधव, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, हरभजन सिंग, अक्षर पटेल, कर्ण शर्मा, धवल कुलकर्णी, स्टु्अर्ट बिन्नी, भुवनेश्वर कुमार, मोहित शर्मा, संदीप शर्मा 
*********

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com



Post a Comment

0 Comments