पंढरपूर लाईव्ह वृत्त :- दि.30 जुन 2015
दि.पंढरपूर मर्चंटस् को.ऑप बँक लि. पंढरपूर या बँकेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची
सभा अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकरीता श्री.पी.टी.घुगे (पिठासीन अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, पंढरपूर) यांचे अध्यक्षतेखाली आज बँकेच्या दे.भ.बाबूराव म्हमाणे सभागृहात संपन्न झाली. सदर सभेमध्ये अध्यक्ष म्हणून श्री.युवराज विलासराव पाटील व उपाध्यक्षा म्हणून सौ.लक्ष्मी वसंत परचंडराव यांची निवड एकमताने झाली. सर्व स्तरातून संबंधितांचे अभिनंदन होत आहे. बँकेचे संचालक श्री.भारत भिंगे, सौ.मंजुश्री सुधिर भोसले, यांनी अनुक्रमे त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी संचालक सर्वश्री.राजेंद्र डोंबे, राहुल म्हमाणे, सोमनाथ आंबरे, नागेश भोसले, अॅड.भगवान भादुले, आनंद शेटे, शितल तांबोळी, किरण घाडगे, राजेश धोकडे, आदित्य फत्तेपूरकर, अरुण शिंदे व व्यवस्थापक श्री.अतुल महादेव म्हमाणे आदी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार अॅ.श्री.भगवान वसंतराव भादुले यांनी मानले. सदर सभा खेळीमेळीत पार पडली.
*********






0 Comments