अनिल शिंदे यांचे दु:खद निधन...

अनिल शिंदे यांचे दु:खद निधन...

पंढरपूर:- येथील इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यावसायिक अनिल शिंदे (वय अंदाजे-43) रा. मनिषा नगर, पंढरपूर यांचे काल रविवार दि.28 जुन 2015 रोजी रात्री 7:35 वा अपघाती निधन झाले.  शुक्रवार दि.26 जुन रोजी रात्री 11 वा. ते आपल्या घराकडे दुचाकीवरून जात असताना   पंढरपूर येथील तहसिल कार्यालया समोरील रस्ता दुभाजकाला धडक बसुन झालेल्या अपघातात त्यांच्या मेंदुला गंभीर दुखापत झाली होती. त्यांचेवर सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटल येथे उपचार चालु होते. रविवारी रात्री त्यांची मृत्युबरोबर चाललेली झुंज अखेर संपली. रात्री 7:35 वा. त्यांची प्राणज्योत मालवली यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन बंधु,  मुलगा उत्कर्ष व  मुलगी गीतेश्वरी असा परिवार आहे.

उत्कर्ष इलेक्ट्रॉनिक या नावाने पंढरपूर येथील नवी पेठेत अनिल शिंदे यांनी आपला व्यवसाय चालु केले होते  1995 ला सुरू केलेला त्यांचा हा व्यवसाय चांगला नावारूपास आला होता.  पुढे त्यांनी स्टेशनरोडवर आपला हा व्यवसाय चालु केला होता. त्यांचेकडून  या व्यवसायाचे धडे घेतलेले त्यांचे दोन बंधु सुनिल व बाळासाहेब यांनी येथील सावरकर  चौक येथे उत्कर्ष गॅलरी ही वेगळी फर्म चालु करून नावारूपास आणली आहे. कै. अनिल शिंदे यांचे आकस्मिक निधनामुळे पंढरपूरच्या इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

आज दि. 29 जुन रोजी दुपारी 1:30 वा. त्यांचेवर येथील वैकुंठ स्मशान भुमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी पंढरपूर मधील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments