सौ.लक्ष्मी पवार यांचे निधन

पंढरपूर :- शुक्रवार दि. 26 जुन 2015 रोजी रात्री 11:15 वा. सौ. लक्ष्मी अशोक पवार (वय-43) रा. हॉटेल नागालॅन्ड मागे, सिंघण नगर, पंढरपूर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दु:खद निधन झाले. येथील उपनगरांमध्ये त्यांना ‘पवार काकु’ म्हणून आदराने संबोधले जायचे.  दरवर्षी येथील उपनगरात संक्रांतीच्या सणातील ‘खण’  या महत्वाच्या वाणाचे वितरण सुवासिणींना करत असत. परिसरातील प्रत्येकाच्या सुख-दु:खात त्या हिरीरिने सहभागी होत.  त्यांच्या आकस्मीक निधनाने परिसरातील महिला-भगिणी हळहळ व्यक्त करत आहेत.

त्यांच्या पश्‍चात पती अशोक पवार (टेलर), दोन विवाहीत मुली, एक अविवाहित मुलगी, जावई, नातवंडे आई-वडील तसेच मारुती पांडुरंग पावणे, सज्जन पांडुरंग पावणे (रा.आढीव, ता.पंढरपूर) हे दोन बंधु आाहेत.
पवारकाकुंच्या अंतीम दर्शनासाठी त्यांच्या रहात्या घरी पंढरपूर शहरातील विविध स्तरातून अनेकजण मोठ्या संख्येने आलेले होते. तसेच त्यांचे माहेर आढीव ता.पंढरपूर या गावातूनही मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments