अधिक मासानिमित्त पंढरीत येणार्‍या भाविकांची रेल्वे प्रवासाला प्रथम पसंती.... गर्दी वाढल्याने रेेल्वे प्रशासनाने केली श्‍वानपथकाद्वारे रेल्वेस्टेशन ची तपासणी... गर्दीचा फायदा घेवुन कांही अनुचित प्रकार घडु नये म्हणून प्रशासनाने घेतली खबरदारी...!

  • अधिक मासानिमित्त पंढरीत येणार्‍या भाविकांची रेल्वे प्रवासाला प्रथम पसंती.... 

  • गर्दी वाढल्याने रेेल्वे प्रशासनाने केली श्‍वानपथकाद्वारे रेल्वेस्टेशन ची तपासणी... 

  • गर्दीचा फायदा घेवुन कांही अनुचित प्रकार घडु नये म्हणून प्रशासनाने घेतली खबरदारी...! 

     पंढरपूर लाईव्ह वृत्त:- आज दि. 28 जुन 2015 रोजी पंढरपूर रेल्वे स्थानकाची कडक तपासणी श्‍वानपथकाद्वारे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली.

अधिक मासानिमित्त पंढरीच्या सावळ्या विठुरायाचे दर्शनासाठी लाखो भाविक भक्त पंढरीत येत असतात. या
वेळी भाविकांनी प्रवासासाठी रेल्वेचा प्रवास करणे अधिक पसंत केल्याने पंढरपूर च्या रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात र्दी झालेली झालेली आढळते. या गर्दीचा फायदा घेवून कुणी समाजकंटकांनी अनुचित प्रकार करु नये, किंवा कांही अघडीत घटना घडू नये याची खबरदारी रेल्वे प्रशासन घेतआहे. याचाच एक भाग म्हणून आज येथील रेल्वे स्थानकावरील बेवारस वस्तु, संशयास्पद वस्तु-व्यक्ती-बॅगा आदींची तपासणी वेटींग रुम, प्लॅटफॉर्म आदी गर्दीच्या ठिकाणी श्‍वानपथकाद्वारे करण्यात आली. ही तपासणी आरपीएफ खात्याचे उपनिरीक्षक श्री.मीना व कर्मचारी नलवडे तसेच सातव यांनी केली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनकाने दिली आहे. 

*******************

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com



Post a Comment

0 Comments