आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सबंधित विभागांनी समन्वय ठेवावा; निवासी उपजिल्हाधिकारी –विजयसिंह देशमुख

आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर  सबंधित विभागांनी समन्वय ठेवावा;  निवासी उपजिल्हाधिकारी –विजयसिंह देशमुख           

पंढरपूर दि. 30: आषाढी यात्रेत पालखी मार्गावरील कामे तसेच भविकांना सोयी-सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सुचनेनुसार सर्व विभागांनी आप-आपसात योग्य तो समन्वय ठेवून त्या दृष्टीने सबंधित विभागांनी नियोजन करुन ही यात्रा निर्विघ्नरित्या पार पाडावी अशी सुचना निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिले.


आषाढी यात्रेनिमित्त प्रशासनातर्फे करण्यात येणा-या तयारीचा आढावा प्रांत कार्यालयातील सांस्कृतीक भवन  येथे घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रविण देवरे, प्रांताधिकारी संजय

तेली, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, तहसिलदार गजानन गुरव, न.पा. चे मुख्याधिकारी शंकर गोरे  उपस्थित श्री. देशमुख म्हणाले की, ही वारी पंढरपूर पुरतीच मर्यादीत न ठेवता  पालख्यांनी   जिल्ह्यात प्रवेश केल्या पासून सर्व  शासकीय यंत्रनेने सतर्क राहावे. जिल्ह्यात एकुन 14 कंट्रोल
रुम उभारण्यात येणार आहेत. पंढरपूर तालुक्यातील पालखी तळावर तिन कंट्रोल रुम उभारण्यात येणार असून त्यामंध्ये पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरी व  ‍ ‍रिंगण सोहळा होणा-या ठिकाणी एक छोटा कंट्रोल रुम तसेच शहरात पाच कंट्रोल रुम सुरु करण्यात येणार आहे.      न. पा. ने रस्त्यावरील अतिक्रमणे काढावीत, स्वच्छता गृहाची व्यवस्था करावी, आरोग्य विभागाने पिण्याच्या पाण्याची तपासणी करावी, पाटबंधारे विभागाने वेळेत पाणी सोडण्याबाबतचे नियोजन करावे, अन्न व औषध प्रशासन विभागाने अन्न भेसळ बाबत दक्षता  घ्यावी व भेसळ आढळल्यास सबंधीतांवर कडक कारवाई करावी, वाहतुक विभागाने वाहतुक
मार्ग निश्चित करुन पार्किंग बाबतचे नियोजन करावे, सर्व विभागाने आपली कामे वेळेत पूर्ण करावीत या कामात हयगय केल्यास कोणत्याही अधिका-यांची गय केली जाणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
मंदिर समिती मार्फत पत्रा शेड व दर्शन रांगेचे काम सुरु केले असुन आषाढी यात्रा कालावधीत मंदिर समिती मार्फत दर्शन  रांगेतील भाविकांना  शुद्ध पिण्याच्या पाण्याची  सोय करण्यात  येणार आहे तसेच दर्शन मंडपामध्ये भाविकांना 24 तास  चहा देण्यात येणार असून दर्शन मंडप व दर्शन रांगेत 25 व्हीडीओ कॅमेरे व 6 स्क्रीन लावण्यात येणार असल्याची माहिती  मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने यानीं यावेळी दिली.

न. पा. तर्फे करण्यात आलेल्या उपाय-योजनांची  माहिती देतांना मुख्याधिकारी गोरे यांनी सांगीतले की पंढरपूर न.पा. तर्फे स्वच्छ विषयक कामाला सुरुवात केली आहे. स्वच्छतेबाबत तिन सत्रामध्ये कामे केली जाणार आहेत. शहरातील 113 मालमत्ता धारकांना नोटीसा देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. तर यावेळी बोलतांना  तालुका वैद्यकीय अधिकारी बोधले म्हणाले की, आरोग्य विभागामार्फत फिरते वैद्यकीय पथक, ॲम्बुलन्सचे नियोजन तसेच पालखी मार्गावरील गावामध्ये धुर फवारणी करण्यात येणार असल्याचे सांगीतले तसेच अतिरिक्त वैद्यकीय स्टाफ मिळावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.    

या बैठकीत आरोग्य, पाणी पुरवठा, विद्युत विभाग, बी.एस.एन.एल., महावितरण, एस. टी.  पोलीस प्रशासन, वाहतुक विभाग, अन्न व औषध  प्रशासन आदी विभागांच्या अधिका-यांनी करावयाची कामा बाबतची तपशीलवार माहिती या बैठकीत दिली. या बैठकीसाठी सबंधीत विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

*******

जगाच्या कानाकोपर्‍यातील लाखो मराठी माणसांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरपूर लाईव्ह आत्ता नव्या रुपात...!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपचे 2.0 हे न्यु  लेटेस्ट व्हर्जन आपल्या मोबाईलमध्ये फ्री इन्स्टॉल करा...
अधिक जलद गती, वापरण्यास अधिक सुलभ आणि नवनविन फीचर्स चा समावेश यामध्ये केलेला आहे...!
हे अ‍ॅप इन्टॉल करण्यासाठी खालील लिंकला आत्ताच क्लिक करा..!

Check out "Pandharpur Live" - https://play.google.com/store/apps/details?id=pandharpurlive.com



Post a Comment

0 Comments