सिताराम भागवत उर्फ भाऊसाहेब तारे यांचे दु:खद निधन

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-  पंढरपूर दि.16 ऑक्टोबर 2015

पंढरपूर अर्बन बँकचे माजी जनरल मॅनेजर श्री.सिताराम भागवत उर्फ भाऊसाहेब तारे यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्युसमयी ते 86 वर्षाचे होते. त्यांच्या पश्‍चातदोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

पंढरपूर अर्बन बँकेमध्ये त्यांनी 40 वर्षे सेवा केली. बँकेच्या अमृतमहोत्सवाचेप्रसंगी श्री.भाऊसाहेब तारे हे बँकेचे जनरल मॅनेजर पदावर कार्यरत होते. जनरल मॅनेजर पदावर कार्यरत असताना त्यांनी बँकेला समर्थ प्रशासन दिले. अभ्यासु व शिस्तप्रिय अशी त्यांची ओळख होती. श्री.भाऊसाहेब तारे यांच्या निधनाबद्दल पंढरपूर अर्बन बँकेच्या कर्मयोगी सभागृह, नवीपेठ, पंढरपूर येथे श्रध्दांजली वाहुन कार्यालयीन कामकाजास सुरवात करण्यात आली. त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Post a Comment

0 Comments