पंढरपूर लाईव्ह वृत्त:- पंढरपूर दि.16 ऑक्टोबर 2015
पंढरपूर शहर व तालुक्यातील असंघटीत श्रमिक महिलांचा मेळावा येथील जिजामाता उद्यान येथेे शुक्रवार दि.16 रोजी सकाळी पार पडला.या मेळाव्यास पंढरपूर शहरातील महिलांची उपस्थिती लक्षणिय होती.या बाबत अधिक महिती देताना तालुकाध्यक्ष सुवर्णा कृष्णा इंदापूरकर म्हणाल्या की,तळागाळातील कष्टकरी महिलांना हळदी-कुंकवाच्या निमित्ताने एकत्र आणून विविध शासकिय माहीती देण्याबरोबरच स्वयंरोजगार करुन अर्थप्राप्ती कशी करावी याबाबतही मार्गदर्शण करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या पंढरपूर तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा राजश्री लोळगे यांच्या हस्ते उपस्थित महिलांची ओटी भरण्यात आली.या वेळी बोलताना राजश्री लोळगे म्हणाल्या, की सद्या नवरात्र महोत्सवाचा काळ चालू असताना शक्तीचे प्रतिक असलेल्या आपण महिला एकत्र येवून एका नव्या पर्वाची सुरवात करीत आहात.आपली जिद्द आणि कष्ट हेच आपल्या यशाचे खरे सारथी आहेत.त्यामुळे महिलांनी स्वत:स कुठेही कमी न समजता अर्थाजनासाठी स्वयंरोजगार करावा.या मेळाव्यास शानूरभाभी शेख,सौ.जुमाळे,प्रमिला पुणेकर,संगीता अष्टेकर,हिराबाई पिंपळगावकर यांच्यासह पंढरपूर शहर व तालुक्यातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





0 Comments