देगाव ता. पंढरपूर येथे लोकअदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन

पंढरपूर लाईव्ह वृत्त:-

पंढरपूर दिनांक 16 :-  

न्यायालय आपल्या दारी या संकल्पनेनुसार देगाव  ता. पंढरपूर  येथे सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी 11.00  वाजता  लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तर  मौजे पटवर्धन कुरोली येथे दिनांक 20 ऑक्टोबर 2015 रोजी सकाळी 11.00 वाजता कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
          मा. उच्च न्यायालय विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्याकडील आदेशान्वये लोक अदालत व कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यावेळी सर्व संबंधितानी उप‍स्थित रहावे असे पी. जे. पाटील, जिल्हा न्यायाधीश-1 तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती पंढरपूर यांनी कळविले आहे.
00000

 
______




 

Post a Comment

0 Comments