राज्य बियाणे महामंडळाला 25 कोटी 93 लाख रुपयांचे अनुदान


'महान्यूजशुक्रवार, ०४ डिसेंबर, २०१५
मुंबई : अकोला येथील महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाला राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून चार प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या प्रकल्पांसाठी 2015-16 करीता 25 कोटी, 93 लाख रुपयाच्या निधीला राज्य शासनाने नुकतीच मान्यता प्रदान केली असून शासनाने या महामंडळास प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे.

25 कोटी 93 लाख रुपये निधीपैकी तब्बल 18 (अठरा) कोटी रुपये अनुदान स्वरुपात राज्यातील सुमारे 20 हजार बीज उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर थेट जमा होणार आहेत.

या निधीमधून महामंडळ बीज प्रक्रिया केंद्राची इमारत व बियाणे साठवणुकीसाठी गोदाम, बी.टी. संकरीत कपाशी बियाणाचा विकास करणे, नवीन जातीचे कडधान्य, गळीत धान्य, तृणधान्य व भाजीपाला बियाणांची पायाभूत व प्रमाणित बियाणांचे उत्पादन आणि वितरण करणे तसेच बियाणांच्या साठवणुकीकरीता 1 हजार मेट्रीक टन क्षमतेचे बियाणे उत्पादन करुन त्याची साठवणूक करण्यासाठी सौर ऊर्जेवर आधारित वातानुकुलित व आर्द्रतारहित भांडाराचे बांधकाम या योजना राबविणार आहे.

मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीने वरील प्रकल्पाला मंजूरी दिली होती. वरील प्रकल्प राबविल्यामुळे कृषी व संलग्न क्षेत्रांचा विकास दर 4 टक्के एवढा साध्य करण्यास मदत होणार आहे

Post a Comment

0 Comments