पंढरपूर लाईव्ह/महाराष्ट्र लाईव्ह न्युज.... फ्लॅश
पुणे दि.20 डिसेंबर 2015(बाबाजी पवळे यांजकडून)
मुळशी आंबवणे परिसरातील ‘अॅम्बी व्हॅली सहारा एअरपोर्टर्’ येथे बेकायदेशीररित्या पार्टीचे आयोजन एका मद्यनिर्मिती करणार्या कंपनीने केले असून या पार्टीमध्ये नेशेच्या कैफात धुंद झालेल्या तरुण-तरुणींचा नंगानाच रात्रभर चालत असतो. त्यांच्या मौजमजेच्या कल्ल्यात येथील नागरिकांची मात्र झोप उडाली आहे. आमचे महाराष्ट्र लाईव्ह न्युजचे प्रतिनिधींनी या भागात जाऊन याबाबत सखोल माहिती घेतली व स्थानिक नागरिकांशीही याबाबत चर्चा केली असताना अतिशय खळबळजनक घटना समोर आली असून आपला गल्ला भरण्यासाठी तरुणाईला नशेच्या गर्तेत लोटणार्यांचा विकृत चेहरा समोर आला आहे.
आज रात्रीही रंगणार पार्टी... पंचायत समिती सभापतींनी तक्रार करुनही कारवाई नाही....नागरिक संतप्त
आज रात्री सुध्दा याठिकाणी पार्टी होणार असल्याची खबर महाराष्ट्र लाईव्ह न्युज ला लागलेली असून या बेकायदेशीर पार्टीवर तात्काळ बंदी आणावी अशी मागणी मुळशी पंचायत समितीच्या सभापतींनी एका निवेदनाद्वारे पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षकांकडे केलेली असतानाही याठिकाणी होत असलेली ही बेकायदेशीर पार्टी चालुच असल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत.
याबाबतचे महाराष्ट्र लाईव्ह न्युज च्या सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार ‘बकार्डी’ या मद्य निर्मिती करणार्या कंपनी कडून बेकायदेशीर पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर पार्टीमध्ये सामील होण्यासाठी घ्याव्या लागणार्या तिकीटाचा दर आठ हजार ते पंचवीस इतका असून तिकीटविक्री ऑनलाईन पध्दतीने केली आहे. या पार्टीत अंमली पदार्थांच्या व मद्याच्या नशेत धुंद झालेली बेफाम तरुणाई कर्णकर्कश संगीताच्या तालावर बेधुंद होऊन रात्रभर नंगानाच करत आहेत त्यांच्या या गोंधळामुळे मात्र परिसरातील नागरीकांना गेल्या दोन दिवसापासून रात्रीची शांत झोप नाही. येथील नागरिकांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी नसताना या ठिकाणी चालु असलेल्या या पार्टीला कांही पोलिस अधिकारीही हजर असल्याची माहिती समोर येत आहे. या बेकायदेशिररित्या चाललेल्या गोंधळात कायद्याचे रक्षकच असे सामील होत असतील तर याला काय म्हणावे? भावी पिढीला नशेच्या गर्तेत लोटून त्यांचे भवितव्य अंध:कारात ढकलण्यास जबाबदार असलेल्या अशा पार्ट्यांच्या आयोजकांच्या मुसक्या वेळीच आवळून संबंधितांवर कायदेशीर कडक कारवाई करणे अत्यावश्यक आहे. तरच असे किळसवाणे प्रकार थांबतील.
या पार्टीमध्ये महाविद्यालयीन युवक युवती व परराज्यातून आलेले तरूण तरूणी अमली पदार्थचे सेवन करून व दारू पिऊन गाण्याच्या तालावर बेंधुद नाचत होती. सदर पार्टीच्या ठिकाणी बकार्डी या मद्य निर्मिती करणार्या कंपनीचे स्टॉल लावण्यात आले आहे. या पार्टी संदर्भात दोन दिवसापुर्वी नागरीकांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक ग्रामीण , तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती, सदर कार्यक्रमाला शासनाची कोणत्याही प्रकारची परवानगी घेण्यात आली नाही. त्यामुळे कोट्यावधी रूपयांचा शासनाचा कर बुडाला आहे. या कार्यक्रमाला पोलीस अधिकारीही हजर होते. ही बाब गंभीर असून या प्रकरणाची सविस्तर चौकशी व्हावी अशी मागणी नागरीकांनी केली आहे.




0 Comments