वाह क्या बात है! श्रद्धा कपूरनं केलं सलग 72 तास काम

मुंबई: अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या दोन सिनेमांसह एका जाहिरातीच्या शूटमध्ये बरीच व्यस्त आहे. मात्र हीच खरी कसोटीची वेळ असते हे तिने आपल्या कामामधून दाखवून दिलं आहे.


श्रद्धाने सलग आठ-दहा तास नव्हे तर तब्बल 72 तास काम केलं. श्रद्धा सध्या बँकॉकमध्ये आपला आगामी सिनेमा ‘बागी’ शूटिंगमध्ये बिझी आहे. याचवेळेस एक ब्राँण्डच्या प्रचारासाठी तिला एका
संमेलनात यावं लागणार होतं. ज्यासाठी तिने बँकॉकमध्ये रात्रभर शुटींग करुन थेट विमानाने मुंबईसाठी रवाना झाली.


सुत्रांच्या माहितीनुसार, श्रद्धा काही तासांसाठी मुंबईला पोहचली आणि संमेलनात सहभागी झाली आणि त्यानंतर तिने दोन बैठकांमध्ये देखील उपस्थिती लावली. त्यानंतर ती थेट बँकॉकला रवाना झाली. जेणेकरुन सिनेमच्या शूटींगवर परिणाम होऊ नये.श्रद्धाच्या प्रवक्त्याने या गोष्टीला दुजोराही दिला आहे. श्रद्धा ब्रँण्डसाठी पूर्ण कटीबद्ध असून ती केवळ दोन तासासाठी मुंबईत आली होती. त्यानंतर ती पुन्हा बँकॉकला रवाना झाली.

श्रद्धा सध्या ‘बागी’ आणि ‘रॉक ऑन 2’ या सिनेमाच्या शूटींगमध्ये मध्ये व्यस्त असून हे दोन्ही सिनेमे 2016 मध्ये रिलीज होणार आहेत.

Post a Comment

0 Comments