शाहरुख-काजोलचा रोमँटिक अंदाज, ‘दिलवाले’चं नवं गाणं रिलीज

शाहरुख खान-काजोल या रोमँटिक जोडीचा आगामी बहुप्रतीक्षित सिनेमा ‘दिलवाले’चं नवं गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं शाहरुख आणि काजोल यांच्यावर चित्रित झालं असून भर पावसात रोमान्स करताना ही जोडी दिसते. छत्री घेऊन डान्स करण्याची स्टेप पाहिल्यावर बॉलिवूडमधील जुन्या गाण्यांची आठवण होते. ‘जनम जनम’ असे या रोमँटिक गाण्याचे बोल आहेत.
मुंबई : शाहरुख खान-काजोल या रोमँटिक जोडीचा आगामी बहुप्रतीक्षित सिनेमा ‘दिलवाले’चं नवं गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं शाहरुख आणि काजोल यांच्यावर चित्रित झालं असून भर पावसात रोमान्स करताना ही जोडी दिसते. छत्री घेऊन डान्स करण्याची स्टेप पाहिल्यावर बॉलिवूडमधील जुन्या गाण्यांची आठवण होते. ‘जनम जनम’ असे या रोमँटिक गाण्याचे बोल आहेत.

शाहरुख-काजोलचा रोमान्स असलेल्या या गाण्याने यू-ट्यूबवर धुमाकूळ घातला आहे. अवघ्या दोन दिवसांत 12 लाख 50 लाखांहून अधिक नेटिझन्सनी हे गाणं यू-ट्यूबवर पाहिलं आहे.

याआधी ‘गेरुआ’ आणि ‘मन मा इमोसन’ ही दोन गाणी रिलीज झाली होती. त्यानंतर ‘जनम जनम’ हे तिसरं गाणं असून प्रीतम चक्रवर्ती यांनी हे गाणं गायलं आहे.

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘दिलवाले’ 18 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरुख खान आणि काजोलच्या चाहत्यांकडून या सिनेमाची आतुरतेने वाट पाहिली जाते आहे. मोठ्या कालावधीनंतर शाहरुख आणि काजोलचा रोमँटिक अंदाज सिनेरसिकांना पाहता येणार आहे. सिनेमातील अफलातून सीन्स, फायटिंगचा थरार, रोमान्स या सर्वांनी पुरेपूर भरलेला असा ‘दिलवाले’ सिनेमा असणार आहे, असे बोललं जातं आहे.

Post a Comment

0 Comments